GK – नवीन वर्षाची सुरुवात सर्वात आधी कोणत्या देशात होते? 99 टक्के लोकांना माहीत नाही उत्तर
जगातील अनेक देश नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घड्याच्या काट्याकडे लक्ष लावून बसले आहेत. मात्र दोन असे देश आहेत, ज्या देशांमध्ये नवीन वर्षाला सुरुवात झाली असून, तेथील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे.

जगातील अनेक देश सध्या नव वर्षाच्या स्वागतासाठी घड्याळात बाराचा टोल पडण्याची वाट पाहात आहेत, मात्र याचदरम्यान प्रशांत महासागरात वसलेल्या दोन देशांमध्ये आता नवीन वर्षाच्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे. भारतामध्ये नवीन वर्ष सुरू होण्यासाठी 9 तास बाकी असतानाच या दोन देशांमध्ये 2026 वर्ष सुरू झालं आहे. जगात सर्वात आधी नवीन वर्षाची सुरुवात ही किरिबाटीमधील किरितिमाती या छोट्या बेटावर झाली आहे. या बेटावर मध्यरात्री आता 2026 च्या आगमनाचा उत्सव सुरू झाला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडमध्ये देखील तेथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात नवीन वर्षाच्या स्वागताला सुरुवात केली आहे.
किरिबाटी नेमकं कुठे आहे?
किरिबाटी हा प्रशांत महासागरामध्ये असलेला एक छोटा बेटाचा देश आहे. जो हवाईच्या दक्षिणेला आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तर -पूर्वेला येतो. हा देश अनेक छोट्या-मोठ्या बेटांचा समूह असून, या देशाचं क्षेत्रफळ 4,000 किलोमीटर एवढं आहे. हा देश 1979 साली इंग्रजांच्या राजवटीमधून मुक्त झाला. या देशाची लोकसंख्या अंदाजे 1.16 लाखांच्या आसपास आहे. इथे नवीन वर्षाचा जल्लोष एक दिवस आधीच साजरा केला जातो. याचं मुख्य कारण म्हणजे 1994 मध्ये करण्यात आलेल्या टाईम झोनमधील बदल हे आहे. या देशामध्ये जेवढ्या बेटांचा समावेश होतो, तेवढ्या बेटांचा टाईम एक सारखा असावा म्हणून टाईम झोनमध्ये हा बदल करण्यात आला आहे.
चारही बाजुने समुद्राचा वेढा
या देशाला चारही बाजुने समुद्राचा वेढा आहे, मात्र आता या देशावर सर्वात मोठं संकट घोंगावत आहे, ते म्हणजे समुद्राची पातळी झपाट्यानं वाढत आहे, त्यामुळे या देशाचा भूभाग हा समुद्रात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र तरी देखील या देशात नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं जातं. या देशानंतर न्यूझीलंड हा असा एक देश आहे, या देशात नवीन वर्षाच्या स्वागताला सुरुवात झाली आहे, न्यूझीलंडच्या चैथम आइसलँडवर नवं वर्षाचं पदार्पण झालं असून, येथील लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागताला सुरुवात केली आहे. या बेटावर केवळ 600 लोक राहतात.
