AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे प्लेट्स फोडतात तर काही ठिकाणी 12 द्राक्ष खाल्ली जातात, जगभरात ‘या’ देशांमध्ये नवीन वर्ष अशा पद्धतीने करतात साजरे

प्रत्येकजण येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत आनंदाने आणि उत्साहाने करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की जगभरातील वेगवेगळे देश काही अनोख्या रीतिरिवाजांनी नवीन वर्षाचे स्वागत करतात? या रीतिरिवाजांमुळेच त्यांचे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन खास बनते. कोणत्या देशांमध्ये नवीन वर्ष कसे साजरे केले जाते याबद्दल जाणून घेऊयात.

कुठे प्लेट्स फोडतात तर काही ठिकाणी 12 द्राक्ष खाल्ली जातात, जगभरात 'या' देशांमध्ये नवीन वर्ष अशा पद्धतीने करतात साजरे
जगभरात काही देशांमध्ये त्यांच्या 'या' अनोख्या पद्धतीने नवीन वर्ष करतात साजरे, जाणून घ्याImage Credit source: टीव्ही 9 हिंदीवरून
| Edited By: | Updated on: Dec 31, 2025 | 7:59 PM
Share

नवीन वर्ष 2026 हे नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. जगभरातील जवळजवळ प्रत्येक देशात लोकं 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या रात्री त्यांच्या स्वतःच्या अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करतात. काही जण नवीन वर्षाचा उत्सव आवाज आणि आतषबाजीने साजरा करतात, तर काही धार्मिक आणि पारंपारिक रीतिरिवाजांशी संबंधित असतात. पण तुम्हाला माहित आहे का की जगभरात असे काही देश आहेत जे एकदम अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करतात. चला तर मग आजच्या लेखात आपण वेगवेगळ्या देशांमध्ये नवीन वर्ष कसे साजरे केले जाते ते जाणून घेऊयात.

जपान – 108 घंटांचा आवाज

जपानमध्ये नवीन वर्षाचे उत्सव अत्यंत शांततापूर्ण आणि आध्यात्मिक पद्धतीने 31 डिसेंबरच्या रात्री, बौद्ध मंदिरांमध्ये “जोया नो केन” नावाची परंपरा पाळली जाते. यामध्ये मंदिरात 108 वेळा घंटा वाजवले जाते. असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीमध्ये 108 प्रकारच्या वाईट इच्छा असतात आणि प्रत्येक घंटाचा आवाज या वाईट इच्छांना दूर करतात. अशाप्रकारे, लोक शुद्ध अंतःकरणाने नवीन वर्षाचे स्वागत करतात.

स्पेन – 12 द्राक्ष खाण्याची परंपरा

स्पेनमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन खूप मजेदार असते. मध्यरात्रीच्या वेळी 12 वेळा घंटेचा नाद केला जातो, त्या प्रत्येक घंटासोबत एक द्राक्ष खाण्याची परंपरा आहे. प्रत्येक घंटासोबत बारा द्राक्षे खाल्ली जातात, जी वर्षातील १२ महिन्यांचे प्रतिनिधित्व करतात. असा विश्वास आहे की जो कोणी योग्य वेळी सर्व द्राक्षे खातो त्याचे वर्ष आनंदी आणि भाग्यवान असते .

स्कॉटलंड – फर्स्ट फूटिंग

स्कॉटलंडमध्ये नवीन वर्षाला “होगमने” म्हणतात आणि “फर्स्ट फूटिंग” ठेवण्याची परंपरा खूप खास मानली जाते. म्हणजेच नवीन वर्षाच्या दिवशी घरात प्रवेश करणारी पहिली व्यक्ती नशीब आणते असे मानले जाते. या ठिकाणी सामान्यतः, उंच आणि काळ्या केसांच्या व्यक्तींना शुभ मानले जाते.

इटली – जुन्या गोष्टींना देतात निरोप

इटलीमध्ये लोक नवीन वर्षाच्या दिवशी जुन्या वस्तू बाहेर काढून टाकण्याची परंपरा पाळतात. विशेषतः जुनी भांडी, फर्निचर किंवा न वापरलेल्या वस्तू खिडकीबाहेर फेकल्या जातात. याचा अर्थ जुन्या वर्षाची नकारात्मकता मागे सोडून नवीन वर्षाचे खुल्या मनाने स्वागत करणे. इटली मध्ये नव वर्षाचे स्वागत करताना लाल कपडे घालणे देखील शुभ मानले जाते.

डेन्मार्क – प्लेट्स फोडून साजरा

डेन्मार्कमध्ये लोक नवीन वर्षाच्या दिवशी त्यांच्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या त्यांच्या दरवाज्याच्या बाहेर काचेच्या प्लेट्स फोडतात. जितक्या जास्त प्लेट्स तुटतील तितके मोठे नशीब. ही परंपरा मैत्री, प्रेम आणि चांगल्या नातेसंबंधांचे प्रतीक आहे. नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी या देशात मध्यरात्री खुर्चीवरून उडी मारणे देखील शुभ मानले जाते.

अमेरिका – टाइम्स स्क्वेअरमध्ये बॉल ड्रॉप

अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध नवीन वर्षाचा उत्सव न्यू यॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये होतो. दरवर्षी रात्री ठीक 12 वाजता आकाशातून पडणारा एक चमकदार चेंडू पाहण्यासाठी लाखो लोक जमतात. चेंडू जमिनीवर पडताच नवीन वर्ष सुरू होते आणि संपूर्ण परिसर फटाक्यांच्या आणि टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून जातो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.