सारा तेंडुलकरच्या हातात बिअरची बाटली? गोव्यातील नको तो Video आला समोर
Sara Tendulkar Viral Video : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर देखील खुप लोकप्रिय आहे. गोव्यात मित्रांसोबत सुट्टी घालवताना रस्त्यावरून चालतानाचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरची संपूर्ण जगात ओळख आहे. सचिनची मुलगी सारा तेंडुलकर देखील खुप लोकप्रिय आहे. तिचे मनमोहक फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता सारा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. गोव्यात मित्रांसोबत सुट्टी घालवताना रस्त्यावरून चालतानाचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत साराच्या हातात एक बाटली दिसत आहे, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. काही नेटकऱ्यांनी ही बिअरची बाटली असल्याचे म्हणत साराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सारा तेंडुलकरच्या हातात बिअरची बाटली?
सारा तेंडुलकरचा व्हिडिओ सोशल मीडिावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सारा लाल फुलांच्या ड्रेसमध्ये तीन मैत्रिणींसह हसत आणि खेळत चालताना दिसत आहे. मात्र सोशल मीडियावरील काही लोकांनी तिला ट्रोल करताना आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या आहेत. काही लोकांनी साराच्या हातात बिअरची बाटली आहे असं म्हटलं आहे. काही लोकांनी कमेंटमध्ये सचिनचा उल्लेख करत दोघांवर टीका केली आहे. अनेकांनी तिला बिअर किंवा अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र काही लोकांनी तिला पाठिंबा देखील दिला आहे.
एका नेटकऱ्याने म्हटले की, सारा 28 वर्षांची आहे, ती एक प्रौढ व्यक्ती आहे, तिला तिचे आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणखी एकाने लिहिले की, “ही कोणत्या प्रकारची मानसिकता आहे? साराचे बिअर पिणे हे सचिनचे दारूचे समर्थन कसे बनते?” आणखी एकाने म्हटले की, “येथे ट्रोल करण्यासारखे काहीही नाही, लोकांनी इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणे थांबवावे.” या सर्व प्रकारानंतर सारा तेंडुलकरने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच हा व्हिडिओ कधी आणि कुठे रेकॉर्ड करण्यात आला याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Sara Tendulkar Spotted With 𝗕𝗲𝗲𝗿 𝗕𝗼𝘁𝘁𝗹𝗲 At Arrosim Beach, Goa 😲 pic.twitter.com/cHSeqI1SzO
— Jara (@JARA_Memer) December 31, 2025
सारा तेंडुलकरची पिलेट्स अकादमी
सचिन तेंडुलकरची मुलगी असण्याबरोबरच सारा स्वतः एक उद्योजक आहे. तिने अलीकडेच मुंबईत स्वतःची पिलेट्स अकादमी सुरू केली आहे. याद्वारे ती फिटनेस आणि वेलनेसला प्रोत्साहन देते. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, चांगले आरोग्य हे फक्त आहार आणि व्यायामावर नव्हे तर संतुलनावर देखील अवलंबून आहे. यात आवडते पदार्थ आणि पर्यटनाच्या संतुलनाचाही समावेश आहे.
