AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारा तेंडुलकरचं मराठी ऐकलं का? व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही वाटलं कौतुक

सध्या सारा तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  या व्हिडीओमध्ये सारा मराठीतून संवाद साधताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स आल्या आहेत. 

सारा तेंडुलकरचं मराठी ऐकलं का? व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही वाटलं कौतुक
sara Tendulkar speaks Marathi in front of paparazzi, viral video surprises fansImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2025 | 2:25 PM
Share

बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची मुलं म्हणजे स्टारकिड्स असो किंवा मग क्रिकेटरची मुलं असो ती कायमच चर्चेचा विषय ठरतात. त्यातल्या त्यात सचिन तेंडुलकरची दोन्हीही मुले म्हणजे सारा आणि अर्जुन हे नेहमी चर्चेत असतात. त्यातल्या त्यात साराही जरा जास्तच चर्चेचा विषय ठरत असते. तिच्या फॅशनपासून ते तिच्या ट्रॅव्हलपर्यंत सगळं काही जाणून घेण्यात चाहत्यांना उत्सुकता असते.

अलीकडेच साराने पिलेट्स अकॅडमी सुरू केली. तसेच ती ऑस्ट्रेलिया पर्यटन विभागाची भारतातील ब्रँड अम्बसेडॉर देखील आहे. अशा विविध कारणाने सारा नेहमीच चर्चेचा विषय असते. तिचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. आताही असाच एक साराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एके ठिकाणी सारा पापाराझींसमोर मराठीत बोलत होती. तिच्या या मराठी भाषेतील संवादामुळे तिच्याबद्दलची ही गोष्ट तिच्या चाहत्यांना नव्यानं समजली आहे.

साराचा पापाराझी समोर मराठीतून संवाद

सारा एका व्हायरल व्हिडीओमध्ये मराठी बोलताना दिसली. हा क्षण सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका सलोन किंवा हॉटेलमधून बाहेर पडताना दिसते. सारा तेंडुलकर आपल्या मैत्रिणीसोबत दिसत आहे. ती आपल्या कारच्या दिशेने जात असते, तितक्यात पापाराझी तिला फोटोसाठी पोज देण्याची विनंती करतात. पण सारा घाईत असल्याने न थांबता थेट कारपर्यंत जाते. यावेळी कारमध्ये बसताना सारा आपल्या मैत्रिणीची वाट पाहत असते.

साराचा मराठीतून संवाद 

कारमध्ये बसताना सारा मराठीतून बोलताना दिसत आहे की ‘ती पण येतेय…’. खरे पाहता सारा ही मराठमोळ्या सचिनची लेक आहे. पण तिचे उच्चशिक्षण भारताबाहेर झाले आहे. तसेच, आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी सारा फारशी मराठी बोलताना दिसलेली नाही. त्यामुळे साराचा हा मराठीतून संवाद साधतानाचा पहिलाच असा व्हिडीओ असेल जो व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्वांना तिच्या मराठी बोलण्याचे तेवढेच कौतुक आणि कुतूहल आहे.

साराचा मराठी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल 

साराचा हा पापाराझीसोबतचा व्हिडीओ @bollywoodsocietyy नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओसोबत ‘साराचे मराठी भाषेतील उच्चार’ असा टेक्स्टही टाकला आहे. या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी तिच्या मराठी बोलण्यावरून कमेंट्स केल्या आहेत. तसेच तिच्याकडून अजून मराठी ऐकण्याची इच्छा असल्याचंही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हटले आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.