संघाच्या विचारांवर आधारित चित्रपटात संजय दत्त, कोण-कोणते बडे कलाकार दिसणार?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारावर आधारलेला एक सिनेमा येतोय. या चित्रपटात संजय दत्त महत्वाची भूमिका करताना दिसणार आहे. इतरही काही बडे कलाकार या चित्रपटात झळकतील.

Sanjay Dutt Movie Aakhri Sawal Starcast : नुकताच प्रदर्शित झालेल्या धुरंधर हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता याच संजय दत्तचा आणखी एक चित्रपट येत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या विचारांवर आधारीत असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात संजय दत्त महत्त्वाची भूमिका करताना दिसेल. संजय दत्तसोबत इतरही काही महत्त्वाचे सिने अभिनेते या चित्रपटात झळकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे नाव ‘आखिरी सवाल’ असे आहे. निखील नंदा या चित्रपटाची निर्मिती करत असून अभिजित मोहन वारंग हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
सध्या या चित्रपटासाठी चित्रीकरण चालू आहे. काही भागाची शूटिंगही करण्यात आली आहे. पुढच्या भागासाठी येत्या 6 जानेवारीपासून शूटिंग चालू होईल. संजय दत्तसोबतच इतरही चार महत्त्वाचे चेहरे या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहेत.
कोणकोणते कलाकार चित्रपटात दिसणार?
मिळालेल्या माहितीनुसार आखिरी सवाल या चित्रपटात समीरा रेड्डी ही अभिनेत्री काम करताना दिसेल. गेल्या 12 वर्षांपासून ती सिनेजगतापासून दूर आहे. परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 2013 साली तिचा कन्नड भाषेतील वरदनायका नावाचा एक चित्रपट आला होता. हा एक क्राईम-अॅक्शन चित्रपट होता. त्यानंतर आता 13 वर्षांन आखिरी सवाल या चित्रपटात दिसेल.
मिथून चक्रवर्ती यांचा मुलगाही चित्रपटात दिसणार
सुल्तान चित्रपटात काम केलेला अमित साध हा अभिनेतादेखील आखिरी सवाल या चित्रपटात काम करताना दिसेल. त्याने काई पो चे या प्रसिद्ध चित्रपटातही महत्त्वाची भूमिका केलेली आहे. नीतू चंद्र ही अभिनेत्रीदेखील तुम्हाला या चित्रपटात दिसेल. तिने याआधी ओय लकी ओय, गरम मसाला या चित्रपटांत काम केलेले आहे. याच चित्रपटात मिथून चक्रवर्तीचा मुलगा नमाशी चक्रवर्ती हा देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याने याआधी द बंगाल फाईल्स, आर्टीकल 15 यासारख्या चित्रपटांत काम केलेले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार येत्या ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
