AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Iran War: इराणच नाही तर संपूर्ण पश्चिम आशियात मृत्यूंचा कहर, कोणत्या देशात किती झाले मृत्यू ?

इराणविरोधात अमेरिका आणि इस्राईल यांनी केलेल्या संयुक्त कारवाईला उत्तर देताना इराण देखील आखातात मोठे नुकसान केले आहे.या हल्ल्यातच इराणमध्ये सर्वाधिक २०१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इतर देशातही मोठी हानी झाली आहे.

Israel-Iran War: इराणच नाही तर संपूर्ण पश्चिम आशियात मृत्यूंचा कहर, कोणत्या देशात किती झाले मृत्यू ?
Israel-Iran War
| Updated on: Mar 01, 2026 | 10:02 PM
Share

इराणवर अमेरिका आणि इस्राईलने संयुक्त कारवाई करीत इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेणी यांची हत्या केली आहे. या हल्ल्याला इराणने देखील प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. इराणच्या क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ल्याने इस्राईल आणि आखाती देशात मोठे नुकसान झाले आहे. इस्राईलच्या बेत शेमेशमध्ये ९ लोकांचा मृ्त्यू झाला आहे आणि एक प्रार्थना स्थळ नष्ट झाले आहे. युएई आणि कुवेत या देशांवर इराणने केलेल्या हल्ल्यातही अनेकांचा मृ्त्यू झाला आहे. शनिवारपासून सुरु असलेल्या या संघर्षात इराणमध्ये आता पर्यंत २०१ हून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत.

इस्राईलच्या एअर स्ट्राईकला उत्तर देशाना इराणने पुन्हा एकदा क्षेपणास्रे डागली आहेत. या हल्ल्यामुळे इस्राईल आणि इराण सोबत आखाती देशातही मनुष्य आणि वित्तहानी झाली आहेत.इस्राईलच्या बेत शेमेश शहरात इराणी बॅलेस्टीक क्षेपणास्रे हल्ल्यात मरणाऱ्यांची संख्या आता ९ झाली आहे. बचाव पथकाने ढीगाऱ्यातून आणखी एकाचा मृतदेह बाहेर काढला आहे.

इराणची ही क्षेपणास्र शहराच्या निवासी भागात कोसळले होते. यामुळे एक सिनेगॉग ( ज्यूंचे प्रार्थना स्थळ ) संपूर्णपणे नष्ट झाले आहे. या हल्ल्यात एक पब्लिक बॉम्ब शेल्टर आणि आसपासच्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. बेत शेमेशचे महापौर शमूएल ग्रीनबर्ग यांनी सांगितले की अजूनही २० लोकांशी संपर्क झालेला नाही, प्रशासनाने त्यांना शोधण्याची मोहिम सुरु केली आहे.

इराणचा हल्ला असा परतवून लावला

इराणच्या या कारवाईचा परिणाम संयुक्त अरब अमिरात ( यूएई ) वर देखील पडला आहे. येथील हल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशातील नागरिकांचा समावेश आहे. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने माहिती दिले की त्यांनी १६५ बॅलेस्टीक मिसाईलचा थांगपत्ता लावला, त्यातील १५२ मिसाईल नष्ट केले. याशिवाय दोन क्रुझ मिसाईलनाही मध्येच रोखले. मंत्रालयाने एकूण ५४१ इराणी ड्रोनचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. त्यातील ५०६ ड्रोनना नष्ट केले आहे.

शेजारील कुवैत देशात देखील या युद्धाचा परिणाम पाहायला मिळाला आहे. कुवैतच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की क्षेत्रातील या ताज्या घटनाक्रमाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर अल-अदान हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. इराणने हे हल्ले अमेरिका आणि इस्राईलच्या कारवाईला उत्तर म्हणून केले असून यामुळे संपूर्ण क्षेत्रात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शनिवारी सकाळी सुरु झालेल्या अमेरिका-इस्राईल आणि इराण संघर्षा दरम्याने आतापर्यंत कोणत्या देशात किती लोक जखमी झाले याची माहिती घेऊयात….

इराण: 201 लोकांचा मृ्त्यू झाला आणि 747 लोक जखमी झाले आहेत.

संयुक्त अरब अमीरात: 3 लोकांचा मृ्त्यू झाला आणि 58 लोक जखमी झाले आहे.

इराक: 2 लोकांचा मृत्यू आणि 5 लोक जखमी झाले आहेत.

कुवैत: 1 व्यक्तीचा मृत्यू आणि 32 लोक जखमी झाले आहेत.

कतार: 16 लोक जखमी झाले आहेत.

ओमान: 5 लोक जखमी झाले आहेत.

बहारीन: 4 लोक जखमी झाले आहेत.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…