AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन वर्षांत 3 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; मनोरंजनाची महापर्वणी

नव्या वर्षाच्या सुरुवातीला तीन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले', 'तुझ्या सोबतीने' आणि 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'चं चौथं पर्व यांचा समावेश आहे.

नवीन वर्षांत 3 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; मनोरंजनाची महापर्वणी
star pravah serialsImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 31, 2025 | 8:50 PM
Share

नव्या वर्षात मनोरंजनाची महापर्वणी घेऊन स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ आणि ‘तुझ्या सोबतीने’ या दोन नव्या मालिका आणि ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’चं चौथं पर्व नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर जिवंत होणार आहे. ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी आणि क्रांतिकारी जीवनावर आधारित ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही भव्य मालिका 5 जानेवारीपासून संध्याकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार असून डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतीराव फुले यांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी महिलांना चूल आणि मूल या मर्यादांमध्ये अडकवून ठेवणाऱ्या समाजव्यवस्थेविरोधात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीबा फुले यांनी ठामपणे एल्गार पुकारला. मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा, स्त्रीला विचार करण्याचं आणि स्वतःचं अस्तित्व घडवण्याचं स्वातंत्र्य मिळावं यासाठी या क्रांतिकारी दाम्पत्याने अपार संघर्ष केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, घरच्यांचा आणि समाजाचा दुहेरी रोष सहन करत त्यांनी शिक्षणाची दारं खुली केली. काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या या विचारवंतांचा जीवनप्रवास मालिकेच्या रुपात उलगडणार आहे.

मी सावित्रीबाई जोतीराव फुले या ऐतिहासिक मालिकेसोबतच ‘तुझ्या सोबतीने’ ही नवी मालिका देखिल स्टार प्रवाहच्या परिवारात दाखल होतेय. एकीकडे मुंबईतल्या चाळीत राहणारी, कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलणारी आणि तरीही आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहाणारी नुपूर. तिच्या मते सगळेच परिपूर्ण नसतात. जग इमपरफेक्शनच्या तत्वांवर चालतं. तर दुसरीकडे ग्लॅमर, लाईट्स आणि परफेक्शनच्या जगातला सुमती इव्हेंट्सचा मालक मल्हार खानविलकर. नुपूर आणि मल्हारचं जग जरी वेगळं असलं एकमेकांच्या साथीने ते प्रवास कसा करतात याची गोष्ट म्हणजे तुझ्या सोबतीने ही मालिका. एतशा संझगिरी आणि अजिंक्य ननावरे ही नवी जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 12 जानेवारीपासून रात्री 9 वाजता या नव्या पात्रांना भेटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

स्टार प्रवाहच्या ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांचं भरभरुन मिळालं. या तिन्ही पर्वातले स्पर्धक आपल्या टॅलेंटने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करत आहेत. मालिकेचं शीर्षकगीत असो वा सिनेमातलं गाणं प्रत्येक स्पर्धकाला स्टार प्रवाहच्या माध्यमातून आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे. मी होणार सुपरस्टारचा मंच ही केवळ स्पर्धा नसून स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देणारा हक्काचा मंच आहे. स्पर्धकांवर सुरांचे संस्कार करण्यासाठी मी होणार सुपरस्टारचा चौथा सीजन सज्ज आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत.

या पर्वातही जजच्या भूमिकेत दिसतील सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि गायक सचिन पिळगांवकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे. नवोदित अभिनेत्री साजिरी जोशी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणार आहे. साजिरी नुकतीच एका सिनेमा आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या गुणी अभिनेत्रीच्या अभिनयाचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. हाच गोडवा घेऊन ती छोट्या उस्तादांसोबत धमाल करणार आहे. 3 जानेवारी पासून रात्री 9 वाजता सुरांची ही मैफल अनुभवता येणार आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.