Cristiano Ronaldo : मायदेशाच्या फुटबॉल संघटनेचीच क्रिस्टीयानो रोनाल्डोवर मोठी कारवाई

Cristiano Ronaldo : क्रिस्टीयानो रोनाल्डो हा मोठा फुटबॉलपटू आहे. अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. फुटबॉलला जागतिक पातळीवर अधिक लोकप्रिय करण्यात त्याचाही महत्वाचा वाटा आहे. या रोनाल्डोवर आता मायदेशात पोर्तुगालमध्येच मोठी कारवाई झाली आहे.

Cristiano Ronaldo : मायदेशाच्या फुटबॉल संघटनेचीच क्रिस्टीयानो रोनाल्डोवर मोठी कारवाई
Cristiano Ronaldo
Image Credit source: X
| Updated on: Oct 20, 2026 | 12:25 PM

दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टीयानो रोनाल्डोवर 30 दिवसांची बंदी घालण्यात आली असून 285 डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. पोर्तुगाल फुटबॉल असोशिएशनने सोमवारी ही माहिती दिली. पोर्तुगालच्या नॅशनल फुटबॉल टीमचं एक शिबीर लागलेलं. त्यात टीममधली आपल्या भूमिकेवरुन रोनाल्डोचा टीमचे कोच जॉर्ज जीसस यांच्याशी वाद झाला. पोर्तुलाग फुटबॉल फेडरेशनच्या शिस्तपालन समितीने 41 वर्षीय रोनाल्डोवरील आरोप योग्य ठरवले. त्याच्यावर 30 दिवस बंदीची कारवाई केली. 285 डॉलरचा दंड ठोठावला. रोनाल्डोने कोच जीससवर दोन वेळा आश्वासन तोडण्याचा आरोप केला आहे.

नेशन्स लीगमध्ये डेन्मार्क विरुद्ध सामन्याआधी क्रिस्टीयानो रोनाल्डो पोर्तुगाल टीमचा कॅम्प सोडून निघून गेलेला. नॉर्वे विरुद्ध सामन्यात सब्स्टीट्यूट म्हणून उतरवलं नाही, असा रोनाल्डोने आरोप केला. टीममधील रोलवरुन दोनवेळा कोचने आपलं आश्वासन मोडलेलं. कोच जीससने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावल्यानंतर वातावरण आणखी तापलं. रोनाल्डोसाठी पुनरागमनाचे दरवाजे मोकळे आहेत असं जीससने म्हटलं आहे.

Loading...

या शिक्षेविरोधात अपील करु शकतो

रोनाल्डोने शिस्तपालनाचे नियम कलम 160(1)चं उल्लंघन केलं. रोनाल्डो या शिक्षेविरोधात अपील करु शकतो. पण आधीच त्याने या संबंधी माफी मागितली आहे. आधीपासूनच शिक्षा होईल अशी अपेक्षा होती. 30 दिवसांचं निलंबन आणि दंड ठोठावण्यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेशन्स लीगमध्ये रोनाल्डो वेल्स विरुद्ध ओपनिंग सामना खेळला होता. पण नंतर 27 सप्टेंबरला नॉर्वे विरूद्धच्या सामन्यात त्याचा सब्स्टीट्यूट म्हणूनही वापर केला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us