Hardik Pandya: मध्यरात्री हार्दिक पंड्याने हे काय केलं? अवतार पाहून सर्वच चकित, Video Viral

हार्दिक पंड्या नेहमीच चर्चेत असतो. हार्दिक मागील काही दिवस सोशल मीडियापासून दूर असलेला पाहायला मिळाला. आता हार्दिकचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Hardik Pandya: मध्यरात्री हार्दिक पंड्याने हे काय केलं? अवतार पाहून सर्वच चकित, Video Viral
| Updated on: Aug 02, 2026 | 9:48 AM

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या भारतीय संघात कोणत्याही मालिकेत खेळताना दिसत नाही, हार्दिक दुखपातीचा सामना करत असल्यामुळे तो सध्या बेंगळुरुतच स्थायिक झाला आहे, मागील काही काळ तो सोशल मीडियापासूनही दूर असलेला पाहायला मिळाला. हार्दिक हा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो, लहान लहान अपडेट्स तो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. पण हल्ली तो सगळ्यापासून दूर असलेला पाहायला मिळाला. आता हार्दिकचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. पण तो व्हिडिओ काही एअरपोर्टवरील नाहीये, हार्दिक हा नेहमी फिरायला जाताना दिसतो त्यामुळे त्याचे एअरपोर्टवरचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. पण यावेळी तसे झालेले नाही.

हार्दिकने रविवारी मध्यरात्री आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. त्याची कथित प्रेयसी, माहिका शर्मा, देखील यावेळी उपस्थित होती. दोघांनी सकाळी झालेल्या प्रसिद्ध सुप्रभातम सेवेत भाग घेतला आणि भगवान व्यंकटेश्वरांचा आशीर्वाद घेतला. मंदिराच्या परिसरातील दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तिरुमला मंदिराच्या भेटीदरम्यान, हार्दिक पंड्या पारंपरिक पांढरा कुर्ता-पायजमा घातलेला दिसला. त्याने डोक्याचे मुंडन केले होते आणि कपाळावर टिळा लावला होता. दरम्यान, महिका शर्मानेही कुर्ता-लेंगीस आणि ओढणी घेतलेली होती. मंदिराच्या धार्मिक परंपरेनुसार पूजा आणि प्रार्थना करत, दोघेही संपूर्ण वेळ आदर आणि भक्तीत दंग दिसले.

गेल्या काही महिन्यांत हार्दिक आणि महिका शर्मा अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहेत. जरी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी, त्यांच्या एकत्र असण्यामुळे सोशल मीडियावर सातत्याने चर्चा होत आहे. हार्दिक पंड्या सध्या दुखापतीमुळे क्रिकेटमधून विश्रांती घेत आहे आणि काही वैयक्तिक वेळ घालवत आहे. पाठीच्या दुखण्यामुळे आणि त्यानंतर मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या आयपीएल 2026 पासून भारतीय संघाबाहेर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त असून भारतीय संघात परतण्यासाठी तयार आहे. त्याने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ‘रिटर्न-टू-प्ले’ प्रोटोकॉल देखील पूर्ण केला आहे, जो कोणत्याही जखमी खेळाडूच्या पुनरागमनासाठी अनिवार्य आहे. त्याचे पुनरागमन पुढील व्हाईट-बॉल मालिकेत शक्य आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us