Rohit Sharma: मोठा राडा झाला, विनोद कांबळी रडू लागले अन्… रोहित शर्मा असं काय म्हणाला?

Rohit Sharma On Vinod Kambli: रोहित शर्माने क्रिकेट खेळायला सुरुवात केली यामागे विनोद कांबळी कसे जबाबदार आहे ते जाणून घ्या...

Rohit Sharma: मोठा राडा झाला, विनोद कांबळी रडू लागले अन्... रोहित शर्मा असं काय म्हणाला?
| Updated on: Oct 22, 2026 | 10:33 AM

Rohit Sharma Cricket Career:  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा क्रिकेट प्रवास हा अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी राहिला आहे. नागपूरमध्ये जन्मलेल्या रोहित शर्माने मोठ्या जिद्दीने आणि अथक प्रयत्नांनी टीम इंडियात एन्ट्री मिळवली. रोहितने भारतीय संघात फक्त जागा मिळवली नाही तर तो कर्णधारही बनला होता. अशातच आता रोहित शर्माने क्रिकेटरच व्हायचं असं का ठरवलं? याचा खुलासा स्वत: हिटमॅनने नुकताच केला आहे. त्याच्या ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ या कार्यक्रमात रोहितने त्याचा प्रवास बोलून दाखवला आहे.

तुझ्या आयुष्यात असा कोणता क्षण होता, जेव्हा तू निर्णय घेतला की तुला क्रिकेटरच व्हायचंय आहे? असा सवाल विचारल्यावर रोहित शर्मा म्हणाला,” 1996 साली मी ठरवलं की मला क्रिकेट खेळायचे.. मी तेव्हा फक्त 9 वर्षांचा होतो. 1996 चा वर्ल्ड कप सुरु होता. सेमीफायनलमध्ये आपल्याला श्रीलंकाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मोठा राडाही झाला होता. लोकांनी वस्तू फेकून दिल्या होत्या, धिंगाणा घातला होता. विनोद कांबळी त्यावेळी रडलेही होते. त्यावेळी मला खूप दु:ख झाले, ” असं रोहित शर्मा म्हणाला.

Loading...

“1996 चा वर्ल्ड कप खूप वेदना देऊन गेला. मला वाटलं की, मला या जागेवर असायला हवे. मला त्या जागेवर एक दिवस जायचे आहे आणि इंडियाला मदत करायला हवी. आणि मी ठरवलं की क्रिकेट खेळायला पाहिजे. बोरीवलीमध्ये मी गल्लीत क्रिकेट खेळायचो पण ते फक्त मस्तीपुरतेच होते. कॉलनीमध्ये मी क्रिकेट खेळलो आणि तिथूनच माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. यासाठी माझ्या जवळच्या लोकांनी खूप संघर्ष देखील केला आहे,” रोहित शर्माने सांगितले.

आता रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळायला उतरणार आहे. यासाठी रोहितने खास मेहनतही सुरु केली आहे. रोहितने पुन्हा एकदा आपल्या फिटनेसवर काम करायला सुरुवात केली आहे. रोहित आता न्यूझीलंडविरुद्ध मैदान गाजवायला रोहित तयार असून त्याला पाहण्यासाठी त्याचे चाहतेही तितकेच उत्सुक असतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us