IND A vs NZ A : न्यूझीलंडमध्ये कसोटी सामन्यात टीम इंडियाचं लाज आणणारं प्रदर्शन, राहुल, यशस्वी जैस्वाल फक्त नावाला स्टार
IND A vs NZ A : 'इंडिया ए' जरी नाव असलं तरी सगळी बॅटिंग ऑर्डर टीम इंडियाचीच आहे. बॅटिंग ऑर्डरवर नजर मारल्यानंतर ही गोष्ट लगेच तुमच्या लक्षात येईल. जर अनऔपचारिक टेस्ट मॅचमध्ये अशी स्थिती असेल तर मुख्य टेस्ट मॅचच्यावेळी काय होईल.

टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. एकीकडे पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु आहे. दुसरीकडे इंडिया ए विरुद्ध न्यूझीलंड ए मध्ये अनऔपचारिक टेस्ट मॅच सुरु आहे. ‘इंडिया ए’ जरी नाव असलं तरी सगळी बॅटिंग ऑर्डर टीम इंडियाचीच आहे. बॅटिंग ऑर्डरवर नजर मारल्यानंतर ही गोष्ट लगेच तुमच्या लक्षात येईल. आजपासून सुरु झालेल्या या टेस्ट मॅचमध्ये इंडिया ए ने पहिली बॅटिंग केली. पण सगळे फलंदाज अपयशी ठरले. जर अनऔपचारिक टेस्ट मॅचमध्ये अशी स्थिती असेल तर मुख्य टेस्ट मॅचच्यावेळी काय होईल. न्यूझीलंडच्या पीचवर टीम इंडियाच्या कमतरता उघड झाल्या आहेत. हे अपयश चिंतेचा विषय आहे. ही अनऑफिशियल टेस्ट मॅच चार दिवसांची आहे. न्यूझीलंड ए ने टॉस जिंकून इंडिया ए ला फलंदाजीची संधी दिली. कॅप्टनचा हा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. या टेस्ट मध्ये इंडिया ए चा पहिला डाव 113 धावांवर आटोपला.
इंडिया ए साठी डावाची सुरुवात केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी केली. टीम इंडियाची ही ओपनिंग जोडी आहे. पाच धावांपुढे त्यांची पार्टनरशिप गेली नाही. केएल राहुलने खातं उघडण्याआधीच न्यूझीलंडचा गोलंदाज फ्रेशर शीटने त्याचा पॅवेलियनचा मार्ग दाखवला. केएल राहुल 8 चेंडू खेळला. यशस्वी जैस्वालने दुहेरी धावा केल्या. पण मोठी खेळी तो करु शकला नाही. जैस्वालने 45 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने फक्त 17 धावा केल्या.
मिडल ऑर्डरही ढेपाळली
इंडिया ए ची फक्त ओपनिंग जोडीच फेल गेली नाही, तर मिडल ऑर्डरमध्येही डाव ढेपाळला. साई सुदर्शनने 13 चेंडूंचा सामना केला. पण तो शुन्यावर बाद झाला. इंडिया ए चा कॅप्टन ध्रुव जुरेलने 13 चेंडूत फक्त 1 धावा केली. देवदत्त पडिक्कलने थोड्या धावा जरुर केल्या. पण तो मोठी खेळी करु शकला नाही. पडिक्कलने 77 चेंडूत 5 चौकरांच्या मदतीने 32 धावा केल्या.
पहिल्या इनिंगमध्ये इतकी वाईट अवस्था
न्यूझीलंड ए विरुद्ध इंडिया ए ची पहिल्या इनिंगमध्ये इतकी वाईट अवस्था होती की, 81 धावांवर 9 विकेट गेलेले. टीमची धावसंख्या 100 पार नेण्यात यश राठोडने महत्वाची भूमिका बजावली. इंडिया ए चा डाव 113 धावांवर आटोपला. त्याने वेगवान 44 धावा केल्या. 49 चेंडूत त्याने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले.