Shubman Gill: वेस्टइंडिजविरुद्ध पहिल्या वनडे मॅचमध्ये थेट भारताचा कॅप्टन बदलणार? गिलबद्दल कोचकडून मोठी अपडेट
Shubman Gill: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वनडे मालिका रंगणार आहे, या वनडे मालिकेसाठी भारताचा पहिला सामन्यात भारताचा कर्णधार बदलणार का यावर कोचने विधान केले आहे.

शुक्रवारी सराव सत्रादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या उसळत्या चेंडूने गिलच्या उजव्या कोपराला दुखापत झाली होती. या उजव्या हाताच्या फलंदाजावर मैदानावर सुमारे २० मिनिटे उपचार करण्यात आले, आता आज रंगणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिल खेळणार की नाही याबद्दल कोच सितांशु कोटक यांनी स्पष्ट केले आहे.
सितांशु कोटक म्हणाले की, “भारतीय कर्णधार शुभमन गिलला गंभीर दुखापत झालेली नाही आणि तो रविवारी ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी तंदुरुस्त आहे.” भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात २७, ३० सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबर रोजी तीन एकदिवसीय सामने खेळले जातील. त्यानंतर ६ ते १७ ऑक्टोबर दरम्यान पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका होईल.
कोटक यांनी भारतीय संघ व्यवस्थापनासमोरील सध्याच्या निवड प्रक्रियेतील द्विधा मनःस्थितीवरही भाष्य केले. यावेळी त्यांनी युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालविषयीही भाष्य केले, जो सर्व फॉरमॅटमध्ये प्रभावी कामगिरी करूनही अनेकदा संघाबाहेर असतो. गिल आणि रोहित शर्मा यांच्या उपस्थितीमुळे जैस्वालला बहुतेक वेळा बाजूला ठेवले गेले आहे. कोटक म्हणाले, “मला वाटते की हे खूप जास्त स्पर्धा आणि अनेक खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळे होत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की जैस्वाल सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे आणि जेव्हाही त्याला संधी मिळते, तेव्हा तो चांगली कामगिरी करतो. तो संघाचा एक भाग आहे आणि सपोर्ट स्टाफ म्हणून आम्ही अर्थातच त्याचे कौशल्य, सराव आणि मानसिक वृत्तीवर लक्ष ठेवतो आणि गौतमसुद्धा त्याच्याशी खूप बोलतो. पण कधीकधी, समजा, जर तीन खूप चांगले यष्टीरक्षक असतील, तर त्यापैकी फक्त एकच खेळेल. त्यामुळे, असे नाही की त्याच्यासोबत अन्याय झाला आहे. मला फक्त वाटते की हा खेळाचाच एक भाग आहे.”
फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले, “त्याने कठोर परिश्रम करून आपल्या संधीची वाट पाहावी. आतापर्यंत, जेव्हा जेव्हा संघाला त्याची गरज भासली आहे आणि त्याला संधी मिळाली आहे, तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली आहे. आम्ही त्याच्या कौशल्यावर आणि सरावावर लक्ष केंद्रित करतो. तो कुठे आहे, कसा खेळतोय आणि संघासोबत असताना काय करतो, हे आम्ही पाहतो. आम्ही फक्त एवढंच करू शकतो आणि तेच करतो.”