IND vs WI: कोहली, गिल नाही तर त्या एकट्याने आम्हाला कमबॅक करु दिला नाही, वेस्ट इंडिजच्या कॅप्टनने कोणावर फोडलं पराभवाचे खापर?

IND vs WI ODI Match: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिला वनडे सामना पार पडला जो भारतीय संघाने जिंकला. आता यानंतर कर्णधार शाई होपने कोणावर पराभवाचे खापर फोडले ते पाहा...

IND vs WI: कोहली, गिल नाही तर त्या एकट्याने आम्हाला कमबॅक करु दिला नाही, वेस्ट इंडिजच्या कॅप्टनने कोणावर फोडलं पराभवाचे खापर?
| Updated on: Sep 28, 2026 | 1:01 PM

IND vs WI 1st ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना रंगला जो भारतीय संघाने जिंकला. आता दोन सामने उरले आहेत. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने कोणावर पराभवाचे खापर फोडले ते पाहा…

वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप म्हणाला की, “चांगली सुरुवात करूनही मधल्या षटकांमध्ये आमची टीम गडबडली, ज्यामुळे वेस्ट इंडिजच्या ६० ते ८० धावा कमी झाल्या.  जर वेस्ट इंडिजने अधिक धावा केल्या असत्या, तर सामन्याचा निकाल काही वेगळा लागला असता. जेव्हा तुम्ही भारतातील चांगल्या खेळपट्टीवर खेळता, तेव्हा तुम्हाला चांगली धावसंख्या उभारावीच लागते. 290 पेक्षा जास्त धावांचा बचाव करताना गोलंदाजीत सर्व गोष्टी आपल्या बाजूने व्हाव्या लागतात, आणि मला वाटतं की फिल्डिंगला पराभवाचं कारण आहे, फील्डिंग करताना आमच्याकडून काही संधी निसटल्या.

Loading...

एका क्षणी ते प्रति षटक सातपेक्षा जास्त धावा देत होते, हे लक्षात घेता, मधली षटके समस्यादायक होती का? असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, मला वाटले की मुलांनी खरोखरच चांगली सुरुवात केली. गेल्या काही मालिकांमध्ये आम्ही सलामीच्या जोडीकडून ही गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहोत. सुरुवातीला जी पार्टनरशिप झाली त्यामुळे एक उत्तम पाया रचला गेला, पण नंतर आम्ही मधल्या षटकांमध्ये गडबडलो आणि शेवटी एक स्पर्धात्मक धावसंख्या उभारणे आमच्यासाठी खूप कठीण झाले.”

“गेल्या काही मालिकांपासून आम्ही चांगल्या ओपनिंग पार्टनरशिपसाठी प्रयत्न करत होतो आणि तसं आज झालेही. पण दुर्दैवाने मधल्या ओव्हरमध्ये आम्ही स्पिनच्या जाळ्यात अडकलो आणि धावांची गती मंदावलेली दिसली. ” असं तो म्हणाला. होपच्या बोलण्यावरुन असं पाहायला मिळतं आहे की, वेस्ट इंडिजच्या संघाला भारताच्या स्पिनर्सकडून म्हणजेच कुलदीप यादवकडून मोठा त्रास झाला, तर त्यांना स्पिनर्समुळे अडचणींचा सामना करावा लागल्याने त्यांचा सामन्यात पराभव झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us