IND vs NZ: भर मैदानात नितीश कुमार रेड्डीची झाली फजिती, कॅच पकडला पण नंतर मागावी लागली माफी, असं काय घडलं पाहा Video
IND vs NZ 1st T20 Match: भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-२० सामना रंगला. या सामन्यात नितीश कुमार रेड्डीची भर मैदानावर कशी फजिती झाली ते पाहा...

IND vs NZ T20 Match: भारत न्यूझीलंड यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना काल रंगला जो भारतीय संघाने ४ विकेट्सने जिंकला. या सामन्यात संजू सॅमनसन आणि नमन धीरने चांगली कामगिरी केली. या सामन्यात एक दृश्य असं पाहायला मिळाले की तुम्हाला हसू आवरणार नाही. नितीश कुमार रेड्डीने असं काय केले त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यादरम्यान भारतीय अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीसोबत एक गंमतीशीर प्रकार घडला. न्यूझीलंडचा फलंदाज बेवन जेकब्सचा झेल घेतल्यानंतर तो जल्लोष करू लागला, पण चेंडू फ्री हिट असल्याचे त्याच्या लगेच लक्षात आले. आपली चूक लक्षात येताच नितीशने हात जोडून तात्काळ माफी मागितली, पण तोपर्यंत ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती.
ही गमतीशीर आणि विचित्र घटना तेव्हा घडली, जेव्हा भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार न्यूझीलंडचा फलंदाज बेवन जेकब्सला गोलंदाजी करत होता. जेकब्सने पूर्ण लांबीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू व्यवस्थित जमिनीवर न पडता हवेत लाँग-ऑनच्या दिशेने उडाला. तिथे तैनात असलेल्या नितीश रेड्डीने कोणतीही चूक न करता तो सोपा झेल घेतला आणि विकेट मिळाल्याचा आनंद साजरा करू लागला. चूक लक्षात येताच त्याने तात्काळ माफी मागितली.
जल्लोष केल्यानंतर काही सेकंदातच नितीश रेड्डीच्या लक्षात आले की तो चेंडू फ्री हिट होता आणि नियमांनुसार फलंदाजाला बाद देता येत नाही. आपली चूक लक्षात येताच त्याने लगेच हात वर करून आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. मात्र, सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी त्याच्या खेळाविषयीच्या जागरूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्यावर टीका केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूच्या लक्षात फ्री हिट न येणे हे अत्यंत निराशाजनक असल्याचे चाहत्यांनी म्हटले.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाची झेल घेण्याची आणि क्षेत्ररक्षणाची कामगिरी चिंतेचा विषय ठरली आहे. नितीश रेड्डीच्या चुकीपूर्वी, सलामीवीर अभिषेक शर्माने डॅरिल मिचेलचा एक सोपा झेल सोडला होता. मिळालेल्या या जीवदानाचा फायदा घेत मिचेलने काही महत्त्वपूर्ण चौकार मारले. बेव्हॉन जेकब्सच्या छोटेखानी खेळीमुळे आणि ग्लेन फिलिप्सच्या नाबाद ८२ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे न्यूझीलंडने पहिल्या डावात २२५ धावांचा डोंगर उभा केला होता.