Sanju Samson: दडपण येते की…सामनावीर बनल्यानंतर अखेर संजूने मनातील खदखद बोलून दाखवली
Sanju Samson On Team India: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका सुरु असून या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला. या सामन्यानंतर संजू सॅमसनने सामनावीरचा पुरस्कार जिंकला.

Sanju Samson On Man Of The Match Award: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना काल रंगला आणि जो भारतीय संघाने जिंकला. कालच्या सामन्यात संजू सॅमसनचे वादळ पाहायला मिळाले. पण अशातच काल भारतीय संघाला एक नवीन मॅचविनरही मिळाला आणि तो म्हणजे नमन धीर. कालच्या सामन्यातील संजूच्या वादळी खेळीचे फळ त्याला मिळाले. काल त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला पण यानंतर संजू असं काय म्हणाला ते पाहा…
सामन्यानंतर सॅमसन काय म्हणाला?
व्यस्त वेळापत्रकामुळे दडपण येते पण ते जुगारुन देशासाठी खेळत राहण्यात भारतीय खेळाडू आनंदी आहेत. तुम्ही जितके जास्त खेळाल, तितके चांगले. मला वाटते की आम्ही आमच्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहोत, जिथे आम्हाला देशासाठी मैदानात उतरून खेळण्याचा अधिक आनंद मिळतो. त्यामुळे, मी खूप उत्सुक आहे.”
सॅमसनने २०२० मध्ये न्यूझीलंडचा दौराही केला होता, मात्र त्याने तीन सामन्यांमध्ये केवळ १० धावा केल्या होत्या. काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता भारतीय खेळाडू म्हणून येणारा दबाव तो कसा हाताळतो, असे विचारले असता तो म्हणाला, “तुम्हाला तुमची स्वतःची पद्धत शोधावी लागते. तुम्हाला तुमची मानसिक स्थिती शोधावी लागते. येथे सर्वोत्तम मानसिक स्थितीत राहण्यासाठी प्रत्येकाचे स्वतःचे मंत्र आहेत. मला वाटते की मला थोडा वेळ लागला, पण मी म्हणू शकतो की मला येथे आनंद घेण्याचा माझा मार्ग सापडला आहे.”
संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी-२० मालिकेत दोन स्फोटक अर्धशतके झळकावत चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. भारतीय संघ आणि त्याचे चाहते या मालिकेतही सॅमसनकडून प्रभावी खेळीची अपेक्षा करत आहेत.
कालच्या सामन्यात नमन धीरने अवघ्या १५ चेंडूत ४२ धावा केल्या. नमनच्या या छोट्या पण महत्त्वाच्या खेळीमुळे भारताला खऱ्या अर्थाने धीर मिळाला. भारताला खऱ्या अर्थाने एक मॅचविनर खेळाडू मिळाला.