IND vs PAK: वॉशिंग्टनचा ‘सुंदर’ कॅच, झेल पाहून तुम्हाला आठवेल सूर्यकुमार यादव, Video Viral

Washington Sundat Catch: भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल सामना सुरु असून या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने एक कॅच पकडला ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

IND vs PAK: वॉशिंग्टनचा सुंदर कॅच, झेल पाहून तुम्हाला आठवेल सूर्यकुमार यादव, Video Viral
| Updated on: Oct 03, 2026 | 1:14 PM

भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्याचे नाणेफेक हे भारतीय संघाने जिंकले असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २१२ धावांचे लक्ष्य दिले. पाकिस्तान संघ जेव्हा आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा वॉशिंग्टन सुंदरने जो कॅच पकडला त्याची आता जोरदार चर्चा सुरु आहे.

वॉशिंग्टन सुंदरने बाउंड्रीवर एक अतिशय चांगला कॅच पकडला. हा कॅच पकडण्यासाठी सुंदर आधी बाउंड्रीच्या बाहेर गेला मग आता आला आणि त्याने तो कॅच पकडला. सुंदरचा कॅप पाहून चाहत्यांना अगदी सूर्यकुमार यादवच्या कॅचची आठवण झाली. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात सूर्याने असाच एक कॅच पकडला होता ज्यानंतर मॅच भारताच्या बाजूने वळली होती.

Loading...

आता सुंदरने एक असाच झेल घेतला ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. सुंदरने एक असा कॅच पकडला ज्याचे सर्वांनीच कौतुक केले. सुंदरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलहोत आहे. सुंदरने पाकिस्तानच्या माझ सदाकतचा कॅच घेतला. माझ सदाकतने १८ चेंडूंत २३ धावा केल्या. अक्षर पटेलच्या गोलंदजीवर मोठा फटका मारायला गेला आणि तो बाद झाला. याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

भारतीय संघाकडून फक्त अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माने चांगली कामगिरी केली. अभिषेक तिलकच्या जोडीने पाकिस्तानला चोप चोपले. अभिषेक शर्मा ६१ धावांवर बाद झाला. त्याने या सामन्यात ६१ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने अवघ्या २८ चेंडूंमध्ये ही धावसंख्या उभारली. तिलक वर्माने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात एक शानदार खेळी केली. त्याने २२ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. या खेळीमुळे भारतीय संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत झाली. वैभव सूर्यवंशी, कर्णधार श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि इशान किशन स्वस्तात बाद झाले. अपेक्षेएवढी कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानच्या फलंदाजांनाही चांगली कामगिरी करता आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us