IND vs PAK फायनल सामन्याचा थरार, कॅप्टन श्रेयस अय्यरने हँडशेक केला की नाही?
IND vs PAK Handshake Controversey: भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल सामन्याचा थरार सुरु आहे. या फायनल सामन्यात हस्तांदोलन झाले की नाही ते पाहा...

Asian Gmaes Final 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ चा पुरुष क्रिकेटचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या रोमांचक सामन्यात, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने पाकिस्तानी कर्णधार फरहानशी हस्तांदोलन केले की मनाही असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
हस्तांदोलन झाले की नाही?
दोन्ही कर्णधाराने हस्तांदोलन केले नाही. भारतीय संघाने यावेळीही पाकिस्तानसोबत हस्तांदोलन न करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. भारतीय संघाने श्रीलंकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर पाकिस्तानने बांगलादेशला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच रोमांचक आणि स्पर्धात्मक राहिले आहेत, परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत जवळपास एकतर्फी सामने जिंकले आहेत. त्यामुळे, या सामन्यात पाकिस्तान भारतीय संघाशी स्पर्धा करू शकतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
गेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला सलग तीन वेळा पराभूत केले होते. त्यानंतर टी-२० विश्वचषकातही पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण १७ टी-२० सामने खेळले गेले आहेत, ज्यात भारतीय संघाने १४ वेळा, तर पाकिस्तानने ३ वेळा विजय मिळवला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघानेही या आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्डम कामगिरी केली. भारतीय महिला क्रिकेट संघानंतर भारतीय क्रिकेट पुरुष संघाडकडूनही मोठ्या अपेक्षा असणार आहेत. पाकिस्तानचा संघ असला की भारतीय संघाला विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. पाकिस्तान संघाची कामगिरी विशेष चांगली नसल्यामुळे भारतीय संघ ही स्पर्धा जिंकेल आणि सुवर्णपदक जिंकेल.
भारताचा प्लेइंग इलेव्हन: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), ईशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह