IND vs PAK कट्टर स्पर्धक आमने सामने, चाहत्यांसाठी रविवार ठरणार खास, कुठे अन् किती वाजता रंगणार?

INDIA vs PAKISTAN Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. या दोन्ही कट्टर स्पर्धकांमधील सामना म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

IND vs PAK कट्टर स्पर्धक आमने सामने, चाहत्यांसाठी रविवार ठरणार खास, कुठे अन् किती वाजता रंगणार?
| Updated on: Oct 25, 2026 | 10:24 AM

IND vs PAK Match: आशियाई क्रिकेट परिषदेने पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. या स्पर्धेची दुसरी आवृत्ती १९ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कतारमध्ये आयोजित केली जाईल. गेल्या वर्षी टी-२० स्वरूपात खेळल्यानंतर, यावर्षी स्पर्धेत एक मोठा बदल पाहायला मिळेल; ही स्पर्धा ५० षटकांच्या स्वरूपात आयोजित केली जाईल. पण यामध्ये चाहत्यांचे विशेष लक्ष हे भारत आणि पाकिस्तान सामन्यावर असणार आहे.

२०२५ मध्ये अंतिम सामन्यात बांगलादेश ‘अ’ संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावल्यामुळे, पाकिस्तान ‘अ’ संघ गतविजेता म्हणून या स्पर्धेत प्रवेश करेल. सर्व सामने दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि दोहा विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानावर खेळले जातील.

Loading...

स्पर्धेचे स्वरूप आणि गट विभागणी

या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत असून, त्यांची प्रत्येकी चार संघांच्या दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

गट अ: श्रीलंका अ, बांगलादेश अ, अफगाणिस्तान अ, आणि हाँगकाँग

गट ब: भारत अ, पाकिस्तान अ, नेपाळ, आणि युएई

गट टप्प्यात, प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर तीन संघांविरुद्ध एक सामना खेळेल (एकूण १२ सामने). प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना २६ नोव्हेंबर रोजी, दुसरा उपांत्य सामना २७ नोव्हेंबर रोजी आणि अंतिम सामना २९ नोव्हेंबर रोजी होईल. स्पर्धेदरम्यान दररोज दोन सामने होतील. पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:३० वाजता आणि दुसरा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल.

भारत-पाकिस्तान अंतिम सामना, २२ नोव्हेंबर

२२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतील. गट ब मधील हा सामना दोहा येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता खेळला जाईल. मागील हंगामात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. जर दोन्ही संघांनी आपापल्या उपांत्य फेऱ्या जिंकल्या, तर २९ नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो. रविवारी हा सामना असल्याने चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक:

  • १९ नोव्हेंबर (सकाळी ११:३०): बांगलादेश ‘अ’ विरुद्ध हाँगकाँग
  • १९ नोव्हेंबर (दुपारी ३:३०): श्रीलंका ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’
  • २० नोव्हेंबर (सकाळी ११:३०): पाकिस्तान ‘अ’ विरुद्ध युएई
  • २० नोव्हेंबर (सकाळी ३:३०): भारत ‘अ’ विरुद्ध नेपाळ
  • २१ नोव्हेंबर (सकाळी ११:३०): श्रीलंका ‘अ’ विरुद्ध हाँगकाँग
  • २१ नोव्हेंबर (दुपारी ३:३०): बांगलादेश ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’
  • २२ नोव्हेंबर (सकाळी ११:३०): युएई विरुद्ध नेपाळ
  • २२ नोव्हेंबर (सकाळी ३:३०): भारत ‘अ’ विरुद्ध पाकिस्तान ‘अ’
  • २३ नोव्हेंबर (सकाळी ११:३०): अफगाणिस्तान ‘अ’ विरुद्ध हाँगकाँग
  • २३ नोव्हेंबर (दुपारी ३:३०): श्रीलंका ‘अ’ विरुद्ध बांगलादेश ‘अ’
  • २४ नोव्हेंबर (सकाळी ११:३०): भारत ‘अ’ विरुद्ध युएई २४ नोव्हेंबर (दुपारी ३:३०): पाकिस्तान ‘अ’ विरुद्ध नेपाळ
  • २६ नोव्हेंबर (दुपारी ३:३०): पहिली उपांत्य फेरी (ए१ विरुद्ध बी२)
  • २७ नोव्हेंबर (दुपारी ३:३०): दुसरी उपांत्य फेरी (बी१ विरुद्ध ए२)
  • २९ नोव्हेंबर (दुपारी ३:३०): अंतिम सामना
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us