IND vs WI : वेस्ट इंडिजचा प्लेयर चार वर्षानंतर संघात परतला, निम्म्या टीम इंडियाला संपवलं, 2 ओव्हरमध्ये फिरवली मॅच

IND vs WI : भारत-वेस्ट इंडिजमध्ये चौथ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा कॅप्टन शे होप विजयाचा हिरो ठरला असला तरी, एका ऑलराऊंडरला देखील विजयाचं तितकचं श्रेय जातं. तब्बल चार वर्षानंतर त्याने दमदार कमबॅक केलं.

IND vs WI : वेस्ट इंडिजचा प्लेयर चार वर्षानंतर संघात परतला, निम्म्या टीम इंडियाला संपवलं, 2 ओव्हरमध्ये फिरवली मॅच
IND vs WI
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 15, 2026 | 9:55 AM

खेळाडूंच्या आयुष्यात नेहमीच चढ-उतार येत असतात. फॉर्म हा कधीच कुठल्या खेळाडूच्या आयुष्यात कायमस्वरुपी नसतो. अगदी सचिन तेंडुलकरही याला अपवाद नाही. मागे पडल्यानंतर पुन्हा भरारी घेणं, पुनरागमन करणं सर्वाधिक कुठे दिसून येतं तर ते क्रीडा क्षेत्रात. स्पोर्ट्समध्ये तुम्हाला अशी बरीच उदहारण पहायला मिळतील, ज्यांनी पिछाडीवर पडल्यानंतर कमबॅक केलय. सध्या सुरु असलेल्या भारत-वेस्ट इंडिज सीरीजमध्ये असाच एक प्लेयर आहे कीमो पॉल. वेस्ट इंडिजचा हा ऑलराऊंडर प्लेयर जवळपास चार वर्ष टीमच्या बाहेर होता. चौथ्या टी20 सामन्यात त्याने 5 विकेट घेऊन दमदार कमबॅक केलय. महत्वाचं म्हणजे टीमच्या विजयात त्याने महत्वाची भूमिका बजावली. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर कीमो पॉलने हे दमदार प्रदर्शन केलं.

14 ऑक्टोंबरला भारत-वेस्ट इंडिजमध्ये टी20 सीरीजमधला चौथा सामना झाला. वेस्ट इंडिजचा कॅप्टन शे होप या विजयाचा हिरो ठरला. त्याने 50 चेंडूत नाबाद 102 धावांची खेळी केली. सीरीजमधील त्याचं हे दुसरं शतक होतं. त्याच्या बळावरच वेस्ट इंडिजने 247 धावा केल्या. शे होपला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.

Loading...

वेस्ट इंडिजला पुन्हा सामन्यात आणलं

राजीव गांधी स्टेडियमवरच्या फ्लॅट पीचवर टीम इंडिया खोऱ्याने धावा लुटत होती. त्यावेळी भारतीय फलंदाजांना रोखण्यात कीमो पॉलने महत्वाची भूमिका बजावली. भारताने फक्त 4 ओव्हरमध्ये 60 धावा केल्या होत्या. पाचव्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आलेल्या किमो पॉलने संजू सॅमसन आणि ईशान किशनला बाद करुन वेस्ट इंडिजला पुन्हा सामन्यात आणलं.

सर्व आशा धुळीस मिळवल्या

नितीश कुमार रेड्डीने फटेकबाजी करुन टीम इंडियाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. 19 व्या ओव्हरमध्ये पॉलने त्याची आणि अक्षर पटेलची विकेट काढून टीम इंडियाच्या विजयाच्या सर्व आशा धुळीस मिळवल्या. याच ओव्हरमध्ये पॉलने प्रिन्स यादवची विकेट काढली. मागच्या सामन्यात प्रिन्सने तीन चौकार मारुन टीम इंडियाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.

बांग्लादेश विरुद्ध ही कमाल केली होती

आपल्या 4 ओव्हरमध्ये किमो पॉलने 41 धावा देऊन पाच विकेट काढल्या. हेच दोन टीममधील विजयाचं अंतर ठरलं. टी20 इंटरनॅशनल करिअरमध्ये किमो पॉलने दुसऱ्यांदा एकाडावात 5 विकेट घेतले. याआधी 2018 साली आठ वर्षांपूर्वी त्याने बांग्लादेश विरुद्ध ही कमाल केली होती. टी20 इंटरनॅशनलमध्ये दोन डावात पाच विकेट घेणारा तो सहावा गोलंदाज आहे. भारताविरुद्ध 5 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे.

किमो पॉलसाठी ही मॅच खास ठरली, कारण डिसेंबर 2022 नंतर या सीरीजमधून त्याने पुनरागमन केलं. चार वर्ष तो वेस्ट इंडिजसाठी कुठल्याही फॉर्मेटमध्ये तो कुठलाही सामना खेळला नव्हता. सीरीजमधील दुसऱ्याच टी20 सामन्यात त्याने आपल्या बॉलिंगने विजय मिळवून दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us