Mohammad Shami: आगरकर OUT प्रज्ञान ओझा IN होताच शमीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, जर कोणी काही चुकीचं केलं…

Mohammad Shami Team India Comeback: मोहम्मद शमीने आता भारतीय संघातील त्याच्या कमबॅकवर एक विधान केले आहे.

Mohammad Shami: आगरकर OUT प्रज्ञान ओझा IN होताच शमीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, जर कोणी काही चुकीचं केलं...
| Updated on: Oct 21, 2026 | 8:55 AM

Mohammad Shami On Comeback: चार वर्षांनंतर भारतीय संघात निवड झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंड मालिकेसाठीच्या टी-२० आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. भुवनेश्वरच्या भारतीय संघात पुनरागमनानंतर, मोहम्मद शमीबद्दलची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शमी देखील संघात परतण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे, परंतु त्याला संधी मिळू शकलेली नाही. २०२५-२६ च्या रणजी ट्रॉफी हंगामात शमीने ३७ बळी घेऊन संघात आपले स्थान पक्के केले होते, परंतु निवड समितीने त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत स्थान दिले नाही. आता स्वत: शमीने त्याच्या पुनरागमनाबद्दल विधान केले आहे.

बंगाल क्रिकेट संघाला २०२६-२७ रणजी ट्रॉफीमधील सर्व्हिसेसविरुद्धच्या एलिट गट ‘क’ मधील दुसऱ्या सामन्यात आपला सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज, मोहम्मद शमीशिवाय खेळावे लागले. आपल्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया देताना शमी म्हणाला, “बघा, खेळपट्टी साथ देत नव्हती. त्यामुळेच मी हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. तरुण खेळाडूंना खेळण्याचा अनुभव मिळावा अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. ते जेवढे जास्त खेळतील, तेवढा जास्त अनुभव त्यांना मिळेल. मी फलंदाज म्हणून खेळू शकत नाही, त्यामुळे मी खेळपट्टीच्या परिस्थितीनुसार खेळतो. मला वाटते की तरुण खेळाडूंनी पुढे यायला हवे. मला देशांतर्गत क्रिकेट खेळणे सुरू ठेवायचे आहे. मी गेल्या हंगामातही देशांतर्गत क्रिकेट खेळलो होतो. ते माझ्यासाठी खूप चांगले आहे. आयपीएलची तयारी करण्यासाठी क्रिकेट खेळत राहणे देखील चांगले आहे.”

Loading...

शमीने असेही सांगितले की मला २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळायचे आहे आणि त्यासाठी मी कसून तयारी करत आहे. मी नेटमध्ये दीड तास गोलंदाजी करतो. मी माझ्या तंदुरुस्तीची काळजी नीट घेतो आणि मी नेहमीच माझे सर्वोत्तम देतो. जेव्हा प्रत्येकजण विश्वचषकात खेळण्याचा विचार करत आहे, तेव्हा मी का नाही? मलाही २०२७ चा विश्वचषक खेळायचा आहे.”

शमीने असेही सांगितले की, “मी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि संघात परतण्याचा मला विश्वास आहे. मी माझ्या सर्वोत्तम टप्प्यात आहे, मी माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. मला फक्त खेळत राहायचे आहे. भुवीने खूप पूर्वीच परतायला हवे होते. तो सातत्याने चांगली कामगिरी करत होता. मला त्याच्यासाठी खूप आनंद होत आहे. बघा, त्याने कधीही क्रिकेट खेळणे थांबवले नाही आणि प्रत्येक सामन्यात आपले सर्वोत्तम दिले.”

शमी म्हणाला की, “मलाही खेळत राहायचे आहे. मला कधी आणि कुठे खेळायला मिळेल हे सांगता येत नाही. म्हणूनच मला खेळत राहायचे आहे,  माझी तंदुरुस्ती अजूनही १००% आहे. माझी विधाने चुकीच्या पद्धतीने मांडली जात आहेत आणि विनाकारण सादर केली जात आहेत. असे होता कामा नये. मी एक खेळाडू आहे आणि मी गोष्टी बोलतो. पण जेव्हा कोणी चुकीचं बोलतं,किंवा काही करत तेव्हा कधीकधी मी सुद्धा रागाने उत्तर देतो.”

शमीने सांगितले की, “अद्याप कोणत्याही निवड समितीने माझ्याशी संपर्क साधलेला नाही. मी भारतीय संघात नाही, मी केंद्रीय करारात नाही, माझ्याशी कोण बोलणार आणि कोणी माझ्याशी का बोलेल, मला फक्त माझं काम करायचं आहे आणि मला आशा आहे की मला पुन्हा खेळण्याची संधी मिळेल.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us