हार्दिक पांड्या याने खरेदी केली ही आलिशान कार, भारतातला पहिलाच व्यक्ती ठरला, कोट्यवधी रुपयांची किंमत

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट स्टार हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्य आणि मैदानातील करामतीमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने अलिकडे नवीन कार खरेदी केली आहे.ही त्याने सहा महिन्यात चौथी कार खरेदी केली आहे.

हार्दिक पांड्या याने खरेदी केली ही आलिशान कार, भारतातला पहिलाच व्यक्ती ठरला, कोट्यवधी रुपयांची किंमत
Hardik Pandya New Car
| Updated on: Mar 29, 2026 | 8:12 PM

Hardik Pandya New Car: हरहुन्नरी क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा त्याच्या लक्झरी कारचा शौकीन आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट टीमचा स्टार ऑल राऊंडर असलेल्या हार्दिक पांड्याने सहा महिन्यातच चौथी लक्झरी कार खरेदी केली आहे. ही कार अलिकडे लाँच झाली आहे. या कारला खरेदी करणारा हार्दिक पांड्या पहिला भारतीय ठरला आहे. हार्दिक पांड्या त्याच्या कारची डिलिव्हरी घेण्यासाठी गर्लफ्रेंड माहिका सोबत शोरुममध्ये पोहचला होता.

हार्दिक पांड्याने खरेदी केली नवीन कार

Loading...

हार्दिक पांड्या याने यावेळी मर्सिडीज – बेंझ व्ही -क्लासला त्याच्या कलेक्शनमध्ये सामील केले आहे. हार्दिक पांड्या या नव्या जनरेशनच्या मर्सिडीझ व्ही क्लासला खरेदी करणारा पहिला भारतीय ठरला आहे. ही लक्झरी एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हीईकल) सुमारे १.४ कोटी रुपयांची आहे. ही कार फॅमिलीच्या आरामदायक प्रवास आणि प्रिमियम लक्झरीसाठी ओळखली जाते. ज्यात स्पेशियस इंटेरिअर, हाय – एंड फिचर्स आणि शानदार कम्फर्ट मिळतो.

हार्दिक पांड्या याच्या गॅरेजमध्ये आधीच अनेक महागड्या आणि दमदार कार आहेत. अलिकडेच त्याने लँड रोव्हर डिफेन्डर खरेदी केली होती. या लँड रोव्हरची किंमत सुमारे ४ कोटी रुपये असून त्याने ही कार त्याच्या मुलाला गिफ्ट केली होती. फेरारी १२ सिलिंड्री कारही त्याच्याकडे असून त्याची किंमत १२ कोटी रुपये आहे. त्याने लॅम्बॉर्गिनी उरुस देखील खरेदी केली असून तिची किंमत ४.५ कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.

येथे व्हिडीओ पोस्ट पाहा –

माहिका शर्मा सोबत कारची डिलिव्हरी

हार्दिक पांड्या या नव्या मर्सिडीज – बेंझ व्ही -क्लास कारची डिलिव्हरी घेण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा सोबत शोरुमला पोहचला होता. ज्याचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या आधी हार्दिक फेरारी १२ सिलिंड्री कारमध्ये माहिका शर्मा सोबत फिरताना दिसत होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us