नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू 1000 टक्क्यांनी वाढली, विराट-धोनीशी बरोबरी

| Updated on: Oct 01, 2021 | 1:24 PM

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा आता स्टार आयकॉन बनला आहे, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजयापासून नीरजचे आयुष्य रातोरात बदललं आहे.

नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू 1000 टक्क्यांनी वाढली, विराट-धोनीशी बरोबरी
Neeraj Chopra
Follow us on

नवी दिल्ली : 7 ऑगस्ट, 2021 रोजी भारतात अगदी खेड्यापाड्यांपासून ते शहरापर्यंत सर्वत्र एकच नाव ऐकू येत होतं. सोशल मीडियावर एकाच व्यक्तीच्या फोटोंचा पाऊस पडत होता. ती व्यक्ती म्हणजे नीरज चोप्रा (Neeraj Chopra). टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजने इतिहास रचला होता. आता या गोष्टीला घडून महिन्याहून अधिकचा काळ लोटला. पण अजूनही नीरजची हवा कमी झालेली नाही. त्यातच नीरजने आता नव्या जाहिरातींमधून दिसू लागला आहे. (Neeraj Chopra’s Brand Value Is Now Equal To Kohli & Dhoni)

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा आता स्टार आयकॉन बनला आहे, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजयापासून नीरजचे आयुष्य रातोरात बदललं आहे. तो अकल्पनीय प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. नीरज चोप्राला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही खूप फायदा झाला आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स केवळ एका दिवसात 1.1 मिलियन्सनी वाढले आहेत.

डीएनएच्या अहवालानुसार, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजयामुळे नीरजची ब्रँड व्हॅल्यू अनेक पटींनी वाढली आहे. रिपोर्ट्सनुसार, नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू 1000 टक्क्यांनी वाढली आहे. वास्तविक, नीरज चोप्राची एंडॉर्समेंट फी, आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या बरोबरीची आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याआधी, नीरज चोप्रा नायकी, स्पोर्ट्स ड्रिंक ब्रँड गेटोरेड, एक्सॉनमोबिल आणि मसलब्लेझ स्पोर्ट्स सप्लीमेंट्स सारख्या ब्रँड्सचा प्रचार करत होता.

जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी मुस्तफा घोष यांनी माध्यमांना सांगितले की, नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू वाढली आहे. त्यानंतर आता जुने करार देखील सुधारित केले जातील. मुस्तफा घोष म्हणाले, “आमच्याकडे जवळपास 80 ब्रँड्सच्या ऑफर्स आहेत. त्याचबरोबर, नीरजकडे पुढील 12-14 महिन्यांत भारत आणि परदेशातील प्रशिक्षण शिबिरांदरम्यान, खूपच कमी दिवस रिकामे आहे, त्यामुळे आम्हाला ब्रँडवर स्वाक्षरी करण्याबाबत निवडक असणे आवश्यक आहे.”

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी 23 वर्षीय नीरज चोप्राची फी सुमारे 15-25 लाख रुपये होती, तर कोहली आणि धोनी 1 ते 5 कोटी रुपयांच्या घरात फी घेतात. अशा परिस्थितीत आता आम्हाला आशा आहे की नीरज चोप्रा या दोन मोठ्या क्रिकेटपटूंपेक्षा जास्त पैसे मिळवू शकेल.

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरीनंतर जाहिरातीत दाखवला जलवा

नीरजने सुवर्णपदक मिळवल्यानंतर सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. अनेकजण नीरजला आपल्या कंपनीचा चेहरा बनवण्यासाठी उत्सुक आहेत. याच संकल्पनेला धरुन क्रेडिट कार्डच बील भरण्यासाठी उपयोगी असणाऱ्या ‘क्रेड’ (CRED) या अॅपने त्यांच्या जाहिरातीत नीरजकडून अभिनय करवून घेतला आहे. मागील वर्षीपासून बाजारात आलेल्या या अॅपमध्ये अनेक खेळाडू तसेच अभिनेते काम करत असतात. त्यातच आता नीरजने देखील या अॅपच्या जाहिरातीत काम केलं आहे. 19 सप्टेंबर रोजी आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच ही जाहिरात प्रदर्शित झाली असून नीरजने स्वत:ही त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये नीरज स्वत: वेगवेगळ्या रुपात दिसत असून समाजातील अनेक जण नीरजच्या यशाचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करुन घेण्याचा वापर कशाप्रकारे करत आहेत. ते दिसून येत आहे.

असं मिळवलं नीरजनं सुवर्णपदक

भालाफेकीत नीरज चोप्राने सुरुवातच धडाकेबाज केली. नीराजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या वेळी त्याने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला तरी अद्यारपही त्याची आघाडी कायम होती. त्यानंतर त्याचा चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरला. पण त्याने सहाव्या प्रयत्नाआधीत सुवर्णपदक खिशात घातलं होतं. त्यामुळे नीरजचा 84 मीटर लांबीचा सहावा थ्रो केवळ औपचारिकता ठरली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं.

इतर बातम्या

ऑक्टोबरमध्ये क्रिकेटचा महासंग्राम, आधी IPL मग T-20 वर्ल्डकपचा थरार, ‘या’ तारखा लॉक करुन ठेवा

धोनीचा स्टेडियमबाहेर उत्तुंग षटकार पाहून साक्षी-झिवाचा जल्लोष, पाहा धोनीची खास ‘Family Moment’

SRH vs CSK : चेन्नईचं विजयासोबत धोनीचा नवा विक्रम, अनोखं शतक केलं नावावर

(Neeraj Chopra’s Brand Value Is Now Equal To Kohli & Dhoni)