AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑक्टोबरमध्ये क्रिकेटचा महासंग्राम, आधी IPL मग T-20 वर्ल्डकपचा थरार, ‘या’ तारखा लॉक करुन ठेवा

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत.

ऑक्टोबरमध्ये क्रिकेटचा महासंग्राम, आधी IPL मग T-20 वर्ल्डकपचा थरार, 'या' तारखा लॉक करुन ठेवा
IPL - T20 WC
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 12:31 PM
Share

मुंबई : क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून विराट कोहली या संघाचा कर्णधार, रोहित शर्मा उपकर्णधार आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. (First IPL and then T20 World Cup, cricket schedule for october)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 12 संघामध्ये रंगणाऱ्या विश्वचषकाच्या थरारात सुपर 12 स्टेजमध्ये ग्रुप 1 मध्ये 6 आणि ग्रुप 2 मध्ये 6 संघ आपआपसांत भिडणार आहेत. ज्यामध्ये दोन्ही गटात प्रत्येकी 4 संघ आधीच निवडले असून इतर चार संघ हे दोन ग्रुप स्टेजेसच्या सामन्यांतून क्वॉलीफाय होऊन स्पर्धेत एन्ट्री घेणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये ग्रपु A मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नामेबिया आणि नेदरलँड हे संघ आहेत. तर ग्रुप B मध्ये बांग्लादेश, स्कॉटलँड, ओमन आणि पापुआ न्यू गिनी हे संघ आहेत. या आठपैकी चार संघ वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील.

दरम्यान, आजपासून सुरु झालेला ऑक्टोबर महिना क्रिकेटरसिकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन आला आहे. कारण, या महिन्यात आयपीएलचे उर्वरित सामने, एलिमिनिटेर, क्वालिफायर आणि फायनल सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर दोनच दिवसांनी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 15 ऑक्टोबरला आयपीएल 2021 चा अंतिम सामना खेळवला जाईल, यावेळी आयपीएल ट्रॉफी कोणत्या फ्रँचायझीच्या खात्यात जाईल, हे निश्चित होईल. मात्र विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी खेळाडूंना जास्त वेळ मिळणार नाही, कारण आयपीएलच्या फायनलनंतर दोन दिवसांनी म्हणजेच 17 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होईल.

टी-20 विश्वचषक स्पर्धेत विराट ब्रिगेडचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे, जिथे त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. मात्र, या महिन्याच्या विश्वचषकात टीम इंडियाला फक्त दोन सामने खेळायचे आहेत. प्रथम त्यांना पाकिस्तानचा सामना करावा लागेल आणि एका आठवड्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी विराट ब्रिगेडचा सामना न्यूझीलंड संघाशी होईल. IPL-14 ही स्पर्धा यूएई मध्ये आयोजित केली आहे आणि टी-20 वर्ल्ड कपचे सामने यूएई आणि ओमानमध्येही खेळवले जातील.

ऑक्टोबरमधल्या ‘या’ तारखा लॉक करुन ठेवा

  • 1 ऑक्टोबर : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
  • 2 ऑक्टोबर : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • 3 ऑक्टोबर : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
  • 4 ऑक्टोबर : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
  • 5 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 6 ऑक्टोबर : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
  • 7 ऑक्टोबर : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स
  • 8 ऑक्टोबर : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • 10 ऑक्टोबर : क्वालिफायर -1
  • 11 ऑक्टोबर : एलिमिनेटर
  • 13 ऑक्टोबर : क्वालिफायर – 2
  • 15 ऑक्टोबर : अंतिम सामना (फायनल)
  • 17 ऑक्टोबर : टी-20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात
  • 24 ऑक्टोबर : भारत पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करेल.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

इतर बातम्या

SRH vs CSK : चेन्नईचं विजयासोबत धोनीचा नवा विक्रम, अनोखं शतक केलं नावावर

VIDEO : सचिनला ड्रेसिंगरुमध्ये पाहताच इशान किशन थबकला, पुढे जे केलं ते पाहाच

T20 World cup संघात ‘या’ खेळाडूला न घेणं भारताला महाग पडणार?, युएईमध्ये करतोय धमाल

(First IPL and then T20 World Cup, cricket schedule for october)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.