SRH vs CSK : चेन्नईचं विजयासोबत धोनीचा नवा विक्रम, अनोखं शतक केलं नावावर

चेन्नई सुपरकिंग्सने सनरायजर्स हैद्राबाद संघावर 6 गडी राखून मोठा विजय मिळवला. यासोबतच त्यांनी प्लेऑफमध्येही स्थान मिळवलं आहे. तर हैद्राबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

SRH vs CSK : चेन्नईचं विजयासोबत धोनीचा नवा विक्रम, अनोखं शतक केलं नावावर
एमएस धोनी
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 12:42 AM

IPL 2021: आयपीएलच्या 44 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने हैद्राबादवर विजय मिळवत (CSK vs SRH) प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. हैद्राबादवर 7 विकेट्सनी विजय मिळवत यंदाच्या पर्वात सर्वात प्रथम प्लेऑफमध्ये संघाला स्थान मिळवून देणाऱ्या धोनीने सोबतच एक दमदार रेकॉर्डही स्वत:च्या नावावर केलं आहे. चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून तब्बल 100 हून अधिक झेल धोनीने टीपले आहेत.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनंतर सर्वाधिक चषक जिंकणारा संघ चेन्नई सुपरकिंग्सचं आहे. त्यांनी 2010, 2011 आणि 2018 साली विजेतेपद मिळवलं आहे. दरम्यान 2008 पासून चेन्नई संघ आयपीएलमध्ये खेळत असून तेव्हापासून धोनीने जवळपास सर्वच सामन्यात संघाचं नेतृत्त्व केलं आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार म्हणून धोनीने 200 वा सामना खेळला होता. दरम्यान 200 सामने खेळल्यानंतर धोनीने आता 100 वा झेल टीपत हाही रेकॉर्ड नावावर केला आहे. या कामगिरीबद्दल चेन्नई सुपरकिंग्सने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

असा जिंकला हैद्राबादविरुद्धचा सामना

प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैद्राबाद संघाकडून मोठा स्कोर होईल अशी आशा सर्वांना होती. संघ शारजाहच्या मैदानावर षटकारांचा पाऊस पाडेल असे वाटत होते. त्यातच मागील सामन्यातचं संघात समाविष्ट झालेला जगाती उत्तम टी 20 फलंदाज जेसन रॉयही चांगली कामगिरी करेल असे वाटत होते. पण तो केवळ 2 धावा करुन बाद झाला. संपूर्ण संघामध्ये रिद्धिमान साहाने 44 धावा करत एकहाती झुंज दिली.

पण त्याला सोबत न मिळाल्याने संघ मोठी धावसंख्या करु शकला नाही. साहाशिवाय अब्दुल आणि अभिषेक यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. ज्यामुळे 20 षटकात हैद्राबादचा संघ केवळ 134 धावांच करु शकला. याऊलट चेन्नईकडून गोलंदाजीही चोख झाली. जोश हेझलवुडने एका षटकात दोन विकेट घेत संपूर्ण सामन्यात 3 विकेट घेतल्या. याशिवाय़ ब्राव्होने 2 आणि जाडेजा आणि ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतला.

चेन्नईचे सलामीवीर पुन्हा चमकले

हैद्राबादने समोर ठेवलेल्या 135 धावाचं आव्हान करताना चेन्नईचे सलामीवीर फाफ डुप्लेसी आणि ऋतुराज गायकवाड यां यांनी पुन्हा उत्तम कामगिरी केली. दोघांची अर्धशतकं थोडक्यात हुकली पण त्याच्या खेळीने चेन्नईला सामना जिंकण्यात मोठी मदत केली. गायकवाडने 38 चेंडूत 45 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 2 षटकार खेचले. तर फाफने 36 चेंडूत 41 धावा केल्या. त्याने 3चौकार आणि 2 षटकार लगावले. त्यांच्यानंतर मधली फळी पटपट बाद झाली पण अखेर रायडू आणि धोनीने अनुक्रमे नाबाद 17 आणि 14 धावा करत सामना चेन्नईच्या खिशात घातला.

हे ही वाचा

T20 World cup मध्येही चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे भारत पराभूत होणार, माजी पाकिस्तानी खेळाडूचा दावा

IPL 2021: दिल्लीच्या आवेश खानचं दमदार प्रदर्शन, यॉर्कर टाकण्यात तरबेज, ‘बॉटल आणि शूज’ आहेत यामागील कारण

AUSW vs INDW, 1st Test: स्मृती मंधानाची कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत भारताची दमदार सुरुवात

(Dhoni took 100th catch from CSK in SRH vs CSK match made new record of catches)

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.