IPL 2021: दिल्लीच्या आवेश खानचं दमदार प्रदर्शन, यॉर्कर टाकण्यात तरबेज, ‘बॉटल आणि शूज’ आहेत यामागील कारण

आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडू त्यांच्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणारा युवा गोलंदाज आवेश खान.

IPL 2021: दिल्लीच्या आवेश खानचं दमदार प्रदर्शन, यॉर्कर टाकण्यात तरबेज, 'बॉटल आणि शूज' आहेत यामागील कारण
आवेश खान
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 5:17 PM

IPL 2021: आयपीएलमधून दरवर्षी काही युवा खेळाडू नावारुपाला येत असतात यंदाच्या पर्वातही (IPL 2021) भारतीय गोलंदाजाचं चांगलं वर्चस्व आयपीएलमध्ये दिसत असून दिल्ली कॅपिटल्स संघाचा (Delhi Capitals) आवेश खान (Avesh Khan) हा खेळाडूही उत्तम खेळ दाखवत आहे.  पर्पल कॅपच्या शर्यतीतही तो सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो त्यांच्या गोलंदाजीमध्ये उपयोग करत असलेल्या उत्कृष्ट यॉर्कर चेंडूचे सर्वच चाहते झाले आहेत. दरम्यान त्याने त्याच्या या यॉर्कर गोलंदाजीला परफेक्ट करण्यामागील कारण सांगितलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदाच्या पर्वात अप्रतिम कामगिरी करत आहे. 11 पैकी 8 सामने जिंकवत 16 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. यामध्ये गोलंदाज आवेशची उत्तम गोलंदाजी संघासाठी चांगलीच फायद्याची ठरली आहे. आवेशने 11 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या एनरिक नॉर्खियाने देखील आवेशकडून यॉर्कर टाकायची कला शिकण्यासारखी आह, असं म्हटलं आहे. दरम्यान आवेशने ही कला आत्मसात करण्यामागे खूप मेहनत घेतली असल्याचं त्याने सांगितलं.

अचूक यॉर्कर टाकण्यामागे ‘शूज आणि बॉटल’

आवेशने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मी सराव करताना 10 ते 12 यॉर्कर टाकायचो. यॉर्कर असा चेंडू आहे ज्यावर खूप मेहनत घेतल्यानंतरच तो अचूनकरित्या टाकायला मिळतो. यासाठी मी सरावादरम्यान समोर शूज किंवा पाण्याची बॉटल ठेवून यॉर्कर टाकण्याचा सराव करायचो. त्यावर अचूक चेंडू फेकून मी आत्मविश्वास आणि परफेक्शन वाढवलं.”

पर्पल कॅपच्या शर्यतीत आवेश

आवेशप्रमाणेच युवा गोलंदाज असणाऱ्या आरसीबीच्या हर्षल पटेलने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत 11 सामन्यात 26 विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान मिळवलं आहे. पण त्याच्या मागोमाग दुसऱ्या स्थानावर असणारा आवेश आहे. त्याने 11 सामन्यात 18 विकेट्स मिळवल्या आहेत. दरम्यान दिल्लीचं ऑफमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आवेशला आणखी सामने खेळायला मिळतील. ज्यामध्ये तो आणखी विकेट घेऊ शकतो.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप-5 गोलंदाज

1. हर्षल पटेल (आरसीबी) –  11 सामने 26 विकेट

2. आवेश खान (दिल्ली कॅपिटल्स)- 11 सामने 18 विकेट

3. जसप्रित बुमराह  (मुंबई इंडियन्स)- 11 सामने 16 विकेट

4. मोहम्मद शमी (पंजाब किंग्स) – 11 सामने 14 विकेट

4. ख्रिस मॉरिस (राजस्थान रॉयल्स) – 10 सामने 14 विकेट

पर्पल कॅपची संपूर्ण यादी पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा

IPL 2021: हर्षल ठरतोय यंदाच्या हंगामातील सर्वात घातक गोलंदाज, आता सर्वोत्कृष्ट रेकॉर्डवर नजर

IPL 2021: विराटसेना सूसाट! मॅक्सवेलचं दमदार अर्धशतक, राजस्थानवर 7 गडी राखून विजय

IPL 2021: मुंबई इंडियन्स संघात बदल, अर्जुन तेंडुलकर स्पर्धेबाहेर, नव्या खेळाडूला संधी, ‘हे’ आहे कारण

(Indian Bowler Avesh khan says he worked hard to learn yorker bowling uses bottle and shoes for practising)

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.