IPL 2021: मुंबई इंडियन्स संघात बदल, अर्जुन तेंडुलकर स्पर्धेबाहेर, नव्या खेळाडूला संधी, ‘हे’ आहे कारण

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर यंदा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. मुंबई इंडियन्स संघाने त्याला विकत घेतलं होतं. पण अद्यापही त्याने एकही आयपीएल सामना खेळलेला नाही.

IPL 2021: मुंबई इंडियन्स संघात बदल, अर्जुन तेंडुलकर स्पर्धेबाहेर, नव्या खेळाडूला संधी, 'हे' आहे कारण
अर्जून तेंडुलकर
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 8:05 PM

IPL 2021: आयपीएलच्या 14 (IPL 2021) व्या पर्वातील 42 वा सामना मंगळवारी अबुधाबीच्या शेख झायद मैदानात खेळवला गेला. मुंबई इंडियन्सने अखेर या सामन्यात विजय मिळवला. दुसऱ्या पर्वाच्या सुरुवातीपासून सलग तीन सामने पराभूत झाल्यानंतर मुंबईने पंजाब किंग्जवर (MI vs PBKS) 6 विकेट्सनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यानंतर लगेचच संघात एक बदल करण्यात आला आहे. संघाचा युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याच्या जागी सिमरनजीत सिंग (Simranjeet singh) याला संधी देण्यात आली आहे.

अर्जुन तेंडुलकरला दुखापत झाल्यामुळे तो उर्वरीत आयपीएलसाठी खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी सिंगला संधी देण्यात आली आहे. सिंग हा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाद असून त्याने विलगीकरणाचा कालावधी संपवून आता संघासोबत सराव करण्यास सुरुवात केली आहे. अर्जूनच्या जागी सिमरनजीतला संघात घेण्याबाबतची माहिती मुंबई इंडियन्सने नुकतीच त्यांच्या सोशल मीडियावरुन दिली आहे.

आयपीएल 2021 लिलावात अर्जुन आकर्षणाचा मुद्दा

अर्जुन तेंडुलकर हा या इंडियन प्रिमीयर लीग 2021 च्या लिलावातील आकर्षणाचा मुद्दा ठरला. अर्जुनला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याच्या 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं. दरम्यान यानंतर अर्जुनवर सोशल मीडियावरुन घराणेशाहीच्या मुद्यावरुन जोरदार टीका करण्यात आली होती.

मुंबई इंडियन्स संघाचे उर्वरीत सामने

– 02 ऑक्टोबर (शनिवार): मुंबई vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

हे ही वाचा

MI vs PBKS : मुंबईच्या पंजाबवरील विजयानंतर MI चे चाहतेच नाही, तर संपूर्ण भारतीय क्रिकेट फॅन्स खुश, ‘हे’ आहे कारण

DC vs KKR: दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्याला वादाचे गालबोट, सामना सुरु असतानाच मॉर्गनच्या अंगावर आला आश्विन, पाहा VIDEO

IPL 2021: दिल्लीचा विजयी रथ थांबवण्यात कोलकात्याला यश, 3 गडी राखून मिळवला दमदार विजय

(Arjun Tendulkar Out of IPL 2021 Mumbai Indians have added Simarjeet Singh as his injury replacement)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.