IPL 2021: दिल्लीचा विजयी रथ थांबवण्यात कोलकात्याला यश, 3 गडी राखून मिळवला दमदार विजय

यंदाच्या हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला अखेर पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना नमवलं आहे. यामुळे दुसऱ्या पर्वातील पहिल्या पराभवाला दिल्लीला सामोरं जावं लागलं आहे.

IPL 2021: दिल्लीचा विजयी रथ थांबवण्यात कोलकात्याला यश, 3 गडी राखून मिळवला दमदार विजय
नितिश राणाने विजय केला पक्का
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 7:43 PM

IPL 2021: आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) या सामन्यात केकेआरने दिल्लीवर तीन गडी राखून विजय मिळवला आहे. अवघ्या 128 धावांचा पाठलाग करणारा केकेआर संघाची अवस्था दिल्लीच्या गोलंदाजानी खराब केली. त्यामुळे सामना 19 व्या षटकापर्यंत तर गेलाच सोबतच केकेआर केवळ 3 विकेट्सच्या फरकाने जिंकली.

केकेआरच्या माऱ्यासमोर दिल्ली गारद

सामन्यात प्रथम गोलंदाजीचा कर्णधार मॉर्गनचा निर्णय केकेआरच्या गोलंदाजानी बरोबर करु दाखवला. अवघ्या 127 धावांमध्ये दिल्लीच्या संघाला रोखण्यात केकेआरला यश आलं. सर्वात आधी संघाच्या 35 धावा झाल्या असताना धवनची विकेट लॉकीने घेतल्यानंतर पुढे सर्वच फलंदाज लवकर बाद होत गेले. काही वेळासाठी स्मिथ आणि पंतने तग धरण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा लॉकीने स्मिथला बाद करत आणखी एक महत्त्वाची विकेट घेतली. संपूर्ण दिल्ली संघाकडून सर्वाधिक धावा कर्णधार पंत आणि स्मिथ यांनी केल्या. त्यांनी प्रत्येकी 39 धावा केल्या. तर धवनने 24 धावा केल्या यशिवाय कोणत्याच फलंदाजाला दुहेरी संख्याही गाठता आली नाही. ललित यादव, अक्षर पटेल हेतर शून्यावर बाद झाले. त्यामुळे दिल्ली केवळ 127 धावाच करु शकली. केकेआरकडून लॉकी, सुनील आणि व्यंकटेश यांनी प्रत्येकी दोन साऊदीने एक विकेट घेतली.

केकेआरचा 3 विकेट्सनी विजय

दिल्लीने दिलेले 128 धावांचे सोपे आव्हान केकेआरच्या संघाचा सध्याचा फॉर्म पाहता त्यांच्यासाठी फारच सोपे होते. पण दिल्लीच्या गोलंदाजानी केलेल्या भेदक माऱ्यासमोर केकेआरचे बहुंताश फलंदाज गारद झाले. सलामीवीर शुभमनने केवळ 30 धावा करत चांगली सुरुवात करुन दिली आणि मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या नारायणने 10 चेंडूत 21 धावांची तुफान खेळी केली. तर सुरुवातीपासून टिकून राहिलेल्या नितीश राणाने नाबाद 36 धावा केल्या. ज्यामुळे केकेआरने अखेर विजय मिळवला. दिल्लीकडून आवेश खानने 3, तर रबाडा, नॉर्खिया, आश्विन आणि यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला.

हे ही वाचा

IPL 2021: मुंबईची आजची भिडत महत्त्वाची, रोहित शर्मा नव्या रेकॉर्डसाठी, आजच्या सामन्यात करु शकतो ‘हा’ विक्रम

Hardik Pandya : चांगल्या लयीत नसल्याने हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातून बाहेर पडणार?, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता

ICC Women ODI Rankings: मिताली राजची रँकिंग घसरली, गोलंदाज झुलन गोस्वामीला मात्र मोठा फायदा

(KKR won Match against DC with wickets 3 in hands)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.