VIDEO : सचिनला ड्रेसिंगरुमध्ये पाहताच इशान किशन थबकला, पुढे जे केलं ते पाहाच

मुंबई इंडियन्स संघाचा युवा खेळाडू इशान किशन जेव्हा मुंबई इंडियन्स संघासोबत भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरला ड्रेसिंग रुममध्ये अचानक पाहतो. तेव्हा जे होते ते पाहण्याजोगे आहे.

VIDEO : सचिनला ड्रेसिंगरुमध्ये पाहताच इशान किशन थबकला, पुढे जे केलं ते पाहाच
सचिन तेंडुलकर आणि इशान किशन

IPL 2021 : दिग्गज भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला क्रिकेटचा देव म्हटलं जात. विक्रमादित्य सचिनने अनेक त्याच्या कारकिर्दीत रेकॉर्ड्स करण्याचाही रेकॉर्ड केला आहे. सध्या भारतीय क्रिकेट गाजवणारा विराट हा देखील सचिनला पाहून क्रिकेट शिकला आहे. त्यामुळे सचिन हे क्रिकेटमधील सर्वोच्चतेचं परीमाण आहे. अशावेळी प्रत्येक युवा खेळाडूच्या मनात सचिनबद्दल एक वेगळी आदराची भावना असते. याचाच प्रत्यय मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये आला.

मुंबईचा 21 वर्षीय युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) याचा मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नुकताच ड्रेसिंग रुममध्ये आलेला इशान समोर सचिनला पाहतो तेव्हा इतका लाजतो की तो लगेच गॉगल, हेडफोन काढून केस सावरु लागतो. याचवेळी नरव्हस झालेला इशान सचिनला ‘गुड आफ्टरनून सर’ म्हणतो. सचिनही त्याच्या विनम्र स्वभावाप्रमाणे इशानला ‘कसा आहेस?’ असं विचारतो. ज्यावर इशानही ‘ग्रेट’ असं उत्तर देतो. दरम्यान या सर्वांमध्ये इशानच्या लाजऱ्या रिएक्शनमुळे सर्व ड्रेसिंग रुममध्ये सर्वच हसत असतात. पोलार्डसह सर्वच खेळाडू इशानच्या रिएक्शनवर हसताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

मुंबई इंडियन्सची यंदाची कामगिरी

तब्बल पाच वेळा आयपीएलचा विजयी खिताब पटकावलेल्या मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) खास कामगिरी केलेली नाही. त्यांनी 11 पैकी केवळ 5 सामने जिंकल्याने त्यांच्या खात्यात केवळ 10 गुणचं आहेत. त्यामुळे यंदा मुंबईचे प्लेऑफमध्ये जाणे अवघड झाले आहे. अशावेळी उर्वरीत सर्व सामने जिंकण मुंबईसाठी महत्त्वाचे आहे.

मुंबई इंडियन्स संघाचे उर्वरीत सामने

– 02 ऑक्टोबर (शनिवार): मुंबई vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह
– 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह
– 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

हे ही वाचा

IPL 2021: ‘धोनी स्टाईल’ने सामना संपवत चेन्नई विजयी, हैद्राबादला 6 गडी राखून दिली मात, प्लेऑफमध्येही मिळवलं स्थान

T20 World cup मध्येही चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे भारत पराभूत होणार, माजी पाकिस्तानी खेळाडूचा दावा

IPL 2021: दिल्लीच्या आवेश खानचं दमदार प्रदर्शन, यॉर्कर टाकण्यात तरबेज, ‘बॉटल आणि शूज’ आहेत यामागील कारण

(Ishan Kishan Cute reaction after seeing sachin tendulkar in Mumbai Indian dressing room went viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI