‘माशाअल्लाह क्या लग रही हैं भाभीजी’, सानियाच्या ‘त्या’ VIDEO वर पाकिस्तानी युजरची कमेंट

सानिया आणि शोएब दोघे सोशल मीडियावर सक्रीय असतात. दोघेही आपल्या चाहत्यांसाठी व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर रिल्स पोस्ट करत असतात. त्यांच्या इन्स्टाग्रामवरील अशाच एका व्हिडिओची सध्या चर्चा सुरु आहे.

माशाअल्लाह क्या लग रही हैं भाभीजी, सानियाच्या त्या VIDEO वर पाकिस्तानी युजरची कमेंट
फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 12:36 PM

लाहोर: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania mirza) सध्या आपला पती पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib malik) सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. सानिया आणि शोएब दोघे सोशल मीडियावर सक्रीय असतात. दोघेही आपल्या चाहत्यांसाठी व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर रिल्स पोस्ट करत असतात. त्यांच्या इन्स्टाग्रामवरील अशाच एका व्हिडिओची सध्या चर्चा सुरु आहे. शोएब बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या आवाजात एक डायलॉग बोलताना दिसतो, ज्याला सानिया गाण्यामधून उत्तर देते.

काय आहे हा VIDEO?
सानियाने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एका व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये शोएब शाहरुखच्या आवाजात सानियाला बोलतो, ‘में तुमसे प्यार नही करता’. त्यावर सानिया हसून त्याला उत्तर देते, ‘इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नहीं जाता’. या व्हिडिओत बॅकग्राऊंडमध्ये गाणं वाजत आहे. सानिया आणि शोएबने फक्त अॅक्टिंग केली आहे.

युजर्सच्या मजेशीर कमेंट
सानियाने तिच्या पोस्टमध्ये यात तुझंच नुकसान आहे, असं लिहिलं आहे. एका पाकिस्तानी यूजरने व्हिडिओवर कमेंट करताना ‘माशाअल्लाह क्या लग रही हैं भाभीजी’ अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एक युजरने सानिया बरोबर बोलतेय, शोएब भाई असे लिहिले आहे.

शोएब-सानियाच्या लग्नाला 11 वर्ष
सानियाने 12 एप्रिल 2010 रोजी शोएब मलिकसोबत लग्न केले. दोघांच्या लग्नाला सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. आजही सानिया मिर्झाला याच कारणासाठी सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. पण दोघांचा संसार सुखाने सुरु आहे. त्यांच्या लग्नाला 11 वर्ष झाली आहेत.

संबंधित बातम्या:

IND vs SA 1st Test: 29 वर्षानंतर इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल टीम इंडिया
IND vs SA: पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया जाणार? असा आहे सेंच्युरियनचा वेदर रिपोर्ट
Video : ‘टिप-टिप बरसा पाणी’वर थिरकले धनश्री आणि युझवेंद्र चहल, काश्मीरमधील व्हिडिओ व्हायरल