Wimbledo 2022 Final, Elena Rybakina : रिबाकिना विम्बल्डन जिंकणारी सर्वात तरुण महिला ठरली, ओन्स जबेउरला नमवलं, इतिहास रचला

| Updated on: Jul 09, 2022 | 10:42 PM

तिसऱ्या सेटमध्ये देखील तिनं दुसऱ्या सेट प्रमाणेच काम केलं.  तिसऱ्या सेटमध्ये दुसऱ्या प्रमाणेच सुरुवात करत 23 वर्षीय खेळाडूनं पुन्हा एकदा तिच्या प्रतिस्पर्ध्यांची दोनदा सर्व्हिस मोडून सेट 6-2 असा जिंकला आणि तिच्या पहिल्या ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Wimbledo 2022 Final, Elena Rybakina : रिबाकिना विम्बल्डन जिंकणारी सर्वात तरुण महिला ठरली, ओन्स जबेउरला नमवलं, इतिहास रचला
रिबाकिना विम्बल्डन जिंकणारी सर्वात तरुण महिला ठरली
Image Credit source: twitter
Follow us on

नवी दिल्ली :  23 वर्षीय एलिना 2011 पासून विम्बल्डन (Wimbledo 2022 Final) जिंकणारी सर्वात तरुण महिला ठरली आहे. एलिना रिबाकिनाने (Elena Rybakina) अंतिम फेरीत (Final) जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ओन्स जबेउरचा पराभव करून पहिलं विम्बल्डन विजेतेपद पटकावलंय. दोन तासांपेक्षा जास्त काळ रंगलेल्या या लढतीत रायबाकिनानं 3-6, 6-2, 6-2 असा विजय मिळवलाय. यासह ती ग्रास कोर्ट स्लॅम जिंकणारी कझाकिस्तानची पहिली खेळाडू ठरली आहे. कझाकस्तानच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला एकेरी खेळाडूने शनिवारपूर्वी एकेरी गटात कोणतेही मोठे विजेतेपद जिंकले नव्हते. विशेष म्हणजे या शानदार विजयासाठी रिबाकिनाने संपूर्ण स्पर्धेत फक्त दोन सेट गमावले. रिबाकिनाच्या या पराक्रमाच्या वाटेत रिबाकिना एकेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारी पहिली कझाक टेनिसपटू ठरली आहे.

स्पर्धेतील खास व्हिडीओ

स्पर्धेत काय झालं?

  1. ऑल इंग्लंड लॉन टेनिस आणि SW19 मधील क्रोकेट क्लबच्या आयकॉनिक सेंटर कोर्टवर दोन्ही खेळाडूंमध्ये काही आकर्षक ठरला
  2. हा सामना जवळपास दोन तास चाललाय.
  3. सामन्याच्या तिसर्‍या गेममध्ये रिबाकिनाची सर्व्हिस तोडून जबेउरनं जोरदार सुरुवात केली
  4. पहिल्या गेममध्ये ब्रेक घेत दुसऱ्या सेटमध्ये दमदार सुरुवात करून रिबाकिनाने सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत जोरदार पुनरागमन केलं
  5. तिनं सुरुवातीच्या दमदार कामगिरीचा सदुपयोग करत पहिला सेट 6-3 असा जिंकला
  6.  कझाकच्या स्टारने दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा जबेउरची सर्व्हिस मोडून सामन्यात बरोबरी साधली आणि शिखर सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये नेला.

त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये देखील तिनं दुसऱ्या सेट प्रमाणेच काम केलं.  तिसऱ्या सेटमध्ये दुसऱ्या प्रमाणेच सुरुवात करत 23 वर्षीय खेळाडूनं पुन्हा एकदा तिच्या प्रतिस्पर्ध्यांची दोनदा सर्व्हिस मोडून सेट 6-2 असा जिंकला आणि तिच्या पहिल्या ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान पराभूत होऊनही जबेउरने इतिहास रचला आणि ग्रँड स्लॅमच्या शिखर लढतीत पोहोचणारी पहिली अरब आणि आफ्रिकन महिला बनली.

रिबाकिनाचा प्रवास

  1. रिबाकिनाने पहिल्या फेरीत कोको वांदेवेघेचा पराभव 7-6(२), 7-5 असा केला.
  2. दुसऱ्या फेरीत कॅनडाच्या बियान्का अँड्रीस्कूचा पराभव 6-4, 7-6(5) असाकेला.
  3. तिसर्‍या फेरीत रिबाकिनाने चीनच्या किनवेन झेंगचा पराभव 7-6(4), 7-5 असा केला.
  4. रिबाकिनाने पेट्रा मार्टिकचा पराभव 7-5, 6-3 असा केला.
  5. उपांत्यपूर्व फेरीत अजला टॉमलजानोविकचा पराभव 4-6, 6-2, 6-3 असा केला.
  6. उपांत्य फेरीत त्याने हालेपविरुद्ध विजय मिळवून फायनलमध्ये धडक मारली