AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sri Lanka crisis:राष्ट्रपती भवन सोडून पळून जाण्याची गोटबाया राजपक्षे यांच्यावर वेळ, पाच नातेवाईकांनी मिळून श्रीलंका लुटली, वाचा सविस्तर

राजपक्षे कुटुंबीयांमुळेच देशावर ही वेळ आल्याचा आंदोलकांचा आक्षेप आहे. राजपक्षे परिवाराने 5,31अब्ज डॉलर्स म्हणजेच 42  हजार कोटी रुपये देशातून बाहेर नेले, असा आरोप आहे.

Sri Lanka crisis:राष्ट्रपती भवन सोडून पळून जाण्याची गोटबाया राजपक्षे यांच्यावर वेळ, पाच नातेवाईकांनी मिळून श्रीलंका लुटली, वाचा सविस्तर
राजपक्षे कुटुंबाने बुडवली श्रीलंकाImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 8:37 PM
Share

कोलंबो – श्रीलंकेत (Sri Lanka crisis) गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने आता उग्र रुप धारण केले आहे. शनिवारी आंदोलनकर्त्यांनी थेट राष्ट्रपती भवनावरच (Rashtrapati bhavan)मोर्चा वळवला. त्यामुळे राष्ट्रपती गोयबाया राजपक्षे (President Gotbaya Rajapaksa)यांना निवासस्थान सोडून पलायन करण्याची वेळ आली. यापूर्वी मे महिन्यातही नागरिकांच्या उद्रेकात राजपक्षे यांचे लहान भाऊ माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेरही आंदोलकांनी घेराव घातला होता. त्यावेळी राजपक्षे कुटुंबीयांनी पळ काढत नेव्हल छावणीत आसरा घेतला होता. राजपक्षे कुटुंबीयांमुळेच देशावर ही वेळ आल्याचा आंदोलकांचा आक्षेप आहे. राजपक्षे परिवाराने 5,31अब्ज डॉलर्स म्हणजेच 42  हजार कोटी रुपये देशातून बाहेर नेले, असा आरोप आहे.

श्रीलंकेला बुडवणारा ताकदवान राजपक्षे परिवार

एप्रिलपर्यंत श्रीलंकाच्या सरकारमध्ये राजपक्षे कुटुंबातील पाचम जण सामील होते. यात राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे, पंतप्रधान महिंदा राजपक्षे, अर्थमंत्री बासिल राजपक्षे, जलसिंचन मंत्री चामल राजपक्षे आणि क्रीडा मंत्री नामल राजपक्षे अशी या पाच जणांची नावे. यातील गोटबाया सोडल्यास आत्तापर्यंत सगळ्यांनी राजीनामे दिले आहेत. एक काळ असा होता की श्रीलंकेच्या राष्ट्रीय बजेटपैकी 70 टक्के वाट्यावर राजपक्षे भावांचा अधिकार होता. राजपक्षे परिवाराने 5.31 अब्ज डॉलर्स म्हणजेच 42 हजार कोटी रुपये देशातून बाहेर नेले, असा आरोप आहे. यात महिंदा राजपक्षे यांचे नीकटवर्तीय अजित निवार्ड कबराल यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यावेळी ते सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेचे गव्हर्नर होते. या पाचही राजपक्षेंची माहिती.

महिंदा राजपक्षे

76 वर्षांचे महिंदा हे राजपक्षे समुहाचे प्रमुख आहेत. गेल्या काही महिन्यांपर्यंत ते पंतप्रधान होते. त्यांच्याविरोधात झालेल्या उग्र निदर्शनांनंतर 10 मे रोजी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. 2004 साली पंतप्रधान राहिलेले महिंदा हे त्यानंतर 2005 ते 2015 या काळापर्यंत देशाचे राष्ट्रपती राहिले. याच काळात त्यांनी भाऊ गोटबाया राजपक्षे यांना तामिळांचे आंदोलन मोडून काढण्याचे आदेश त्यांनी दिले होते. महिंदा यांच्या कार्यकाळातच श्रीलंका आणि चीनमधील संबंध वाढले आणि त्याच काळात चीनमधून पायाभूत प्रकल्पांसाठी 7 अब्ज डॉलर्स श्रीलंकेला मिळाले. यातील अनेक प्रोजेक्ट हे कागदावरच राहिले आणि त्यांच्या नावावर देशात प्रचंड भ्रष्टाचार झाला.

गोटबाया राजपक्षे

सैन्यातील माजी अधिकारी असलेले गोटबाया 2019 साली श्रीलंकेचे राष्ट्रपती झाले. संरक्षण मंत्रालयातील सचिव पदासह इतर अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. 2005 ते 2015 या काळात महिंदा राजपक्षे हे राष्ट्रपती असताना त्यांनी संरक्षण सचिव या पदावरुन तामिळ फुटीरतावादी आणि एलटीटीई संघटनेला नेस्तनाबूत केले. गोटबाया यांनी केलेली करकपात, शेतीत रासायनिक खतांच्या वापरावर घातलेली बंदी अशा धोरणांमुळे आजचे संकट तीव्र झाल्याचे मानण्यात येते आहे.

बासिल राजपक्षे

71वर्षांचे बासिल राजपक्षे हे देशाचे अर्थमंत्री होते. श्रीलंकेत सरकारी कंत्राटात कमिशन घेण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना मिस्टर 10 परसेंट म्हणून ओळखण्यात येत होते. सरकारी तिजोरीत लाखो डॉलर्सची अफरातफर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याविरोधात काही गुन्हेही दाखल झाले. मात्र गोटबाया राष्ट्रपतीपदी आल्यावर सर्व गुन्हे मागे घेण्यात आले.

चामल राजपक्षे

79वर्षांचे चामल हेमहिंदा यांचे मोठे भाऊ आहेत. ते जहाजबांधणी आणि हवाई वाहतूकमंत्री पदी होते. अखेरच्या काळात त्यांच्याकडे सिंचन खाते होते. पहिल्या महिल्या पंतप्धान रिरिमावो भंडारनायके यांचे बॉडीगार्ड म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.

नामल राजपक्षे

35 वर्षांचे नामल राजपक्षे हे महिंदा राजपक्षे यांचे मोठे पुत्र. 2010 साली वयाच्या 24 व्या वर्षी तो खासदार झाले. आत्तापर्यंत त्यांनी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय सांभाळले. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी झाल्याचा आरोप आहे. मा६ त्यांनी नेहमी हे आरोप नाकारले आहेत.

कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल.
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम.
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण....
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?.
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?.
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?.
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर.
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्...
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्....
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात.