PAK vs ENG: पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या टीमला’व्हायरस’ची लागण, इतके खेळाडू बाधित ?

| Updated on: Nov 30, 2022 | 1:51 PM

इंग्लंडची टीम पाकिस्तानमध्ये व्हायरसची शिकार, खेळाडूंना आराम करण्याचा सल्ला

PAK vs ENG: पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या टीमलाव्हायरसची लागण, इतके खेळाडू बाधित ?
PAK vs ENG
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : अनेक वर्षानंतर T20 विश्वचषक स्पर्धेतील टीम इंग्लंड (ENG) पाकिस्तानमध्ये (PAK) कसोटी मालिका खेळण्यासाठी दाखल झाली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना झाला होता. इंग्लंडच्या खेळाडूंनी चांगली खेळी केली, त्यामुळे पाकिस्तान टीमचा पराभव झाला. पहिली कसोटी सुरु होण्यापुर्वी ‘अज्ञात व्हायरस’ची इंग्लंडच्या 14 सदस्यांना लागण झाल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. त्यामुळे ज्या खेळाडूंना (England Player) लागण झाली आहे, त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तपासणी केल्यानंतर इंग्लंड टीममधील अनेकांच्या शरिरात संबंधित विषाणु आढळून आला आहे, त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आढळून आलेला विषाणु कोरोना नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्यांना लागण झाली आहे, ते खेळाडू सराव सत्रात सुद्धा दिसलेले नाहीत.

उद्या इंग्लंड टीमची पहिली कसोटी मॅच रावळपिंडीमध्ये होणार आहे. पाकिस्तानमध्ये तीन कसोटी सामने होणार आहेत. 17 वर्षानंतर इंग्लंड टीम पाकिस्तान दौऱ्यावर आली आहे. उद्याच्या कसोटी मॅचसाठी अकरा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड टीमची प्लेइंग इलेव्हन

बेन स्टोक्स (सी), जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन फोक्स (डब्ल्यूके), लियाम लिव्हिंगस्टोन, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानची टीम

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सर्फराज अहमद, शान मसूद, सौद शकील, सलमान आगा, नसीम शाह, नौमान अली, अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, फहीम अश्रफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, अबरार अहमद, जाहिद महमूद, मोहम्मद नवाज, अझहर अली, मोहम्मद अली