Rohit Sharma: रोहित शर्माच्या डबल सेंच्युरीसाठी विराट बाद व्हायचा? हिटमॅनच्या खुलाशाने सगळेच थक्क

Rohit Sharma News: रोहित शर्माने नुकताच एक खुलासा केला आहे. ज्यात त्याने त्याची डबल सेंच्युरी होण्यमागे विराट कोहलीचा हात असल्यचे म्हटले आहे.

Rohit Sharma: रोहित शर्माच्या डबल सेंच्युरीसाठी विराट बाद व्हायचा? हिटमॅनच्या खुलाशाने सगळेच थक्क
| Updated on: Sep 27, 2026 | 1:23 PM
गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा माजी खेळाडू रोहित शर्मा चर्चेचा विषय बनला आहे. आधी रोहित निवृत्ती घेणार यामुळे चर्चेत होता, तर ‘आता फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ यामुळे चर्चेत आहे. हा शो सध्या ट्रेंडिगला असून रोहित शर्माने या शोमध्ये अनेक खुलासे केले आहेत. रोहित शर्माच्या या शोमध्ये आतापर्यंत अनेक क्रिकेटर्सने हजेरी लावली आहे, ज्यात श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर आणि शिखर धवन यांनी हजेरी लावली आहे. आता रोहित शर्माच्या या शोमध्ये एक मोठा खुलासा झाला आहे.
“जेव्हा माझी पहिली डबल सेंच्युरी झाली होती, तेव्हा विराट कोहली माझ्यासोबत क्रीझवर खेळत होता. त्या मॅचला तो माझ्यासोबत रन घेत असताना तो रनआऊट झाला होता. त्यानंतर दुसऱ्या वेळेस देखील जेव्हा विराट कोहली माझ्यासोबत खेळताना 66 वर रन आऊट झाला, तेव्हा माझी डबल सेंच्युरी झाली, असे रोहित शर्माने बोलून दाखवले. पण जेव्हा तुमचा टीममेट रनआऊट होतो, तेव्हा अर्थात तुम्हाला वाईट वाटतं. पण दोन्ही वेळेस असे झाले की,  विराट कोहली रन आऊट झाला अन् त्या दोन्ही वेळेस माझी डबल सेंच्युरी झाली.”
“कोणालाच असं वाटत नाही की, तुमचा टीममेट्स तुमच्यासोबत रनआऊट होवो, तुम्ही हाच विचार करत असता की, तुमचे टीममेट्सने अदिक रन करावेत, तोडफोड बॅटिंग करावी. पण कधी कधी अशा घटना होऊन जातात आणि जो निव्वळ योगायोग ठरतो. पण ज्याचा फायदा मलाच झाला, ” असंही रोहित शर्मा म्हणाला
रोहित शर्माने आपले पहिले डबल सेंच्युरी 2 नोव्हेंबर 2013 रोजी बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले होते. या मॅचमध्ये त्याने 158 बॉलमध्ये 12 षटकार आणि 16 चौकार मारून 209 धावा केल्या होत्या. त्याने आपली दुसरीडबल सेंच्युरी द्विशतक 13 नोव्हेंबर 2014 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्ध केलं होतं. तर रोहितने आपले तिसरे डबल सेंच्युरी द्विशतक 13 डिसेंबर 2017 रोजी मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्ध केलं होतं.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us