Rohit Sharma: लोकांना मसाला हवा असतो म्हणून मी आणि विराट असं करतो… हिटमॅनच्या विधानाची जोरदार चर्चा

Rohit Sharma Share Bond With Virat Kohli: २०२७च्या वनडे विश्वचषकासाठी रोहित शर्माने विराट कोहलीसोबत काही खास प्लान बनवला आहे की नाही यावर आता स्पष्टीकरण दिले आहे.

Rohit Sharma: लोकांना मसाला हवा असतो म्हणून मी आणि विराट असं करतो... हिटमॅनच्या विधानाची जोरदार चर्चा
| Updated on: Sep 29, 2026 | 8:50 AM

Rohit Sharma: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पार पडला जो भारतीय संघाने जिंकला, आता उर्वरित दोन सामने बाकी आहेत. आता पहिल्या सामन्यात विराट कोहलीने दमदार शतक ठोकले होते, यानंतर आता रोहित शर्माने विराट कोहलीवर एक विधान केले आहे.

रोहित म्हणाला की, ‘रन मशीन’ला २०२७ चा विश्वचषक येत आहे हे सांगण्याची गरज नाही, कारण संघात सर्वाधिक विश्वचषक खेळल्यामुळे त्याला काय करायचे आहे हे आधीच माहित असते. मला वाटतं, ‘रोको’ याची सुरुवात आम्ही ऑस्ट्रेलियात खेळत असताना किंवा ऑस्ट्रेलियानंतर लगेचच भारतात आलो तेव्हा झाली. तेव्हापासूनच याची सुरुवात झाली आणि जेव्हा कधी हे टीव्हीवर येतं, तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघून हसतो. हे चांगलं आहे, लोकांनाही मस्ती, मजा आणि मसाला हवा असतो म्हणून आम्ही हे करतो. आम्ही दोघेही जवळपास एकाच वेळी खेळायला सुरुवात केली. मी २००७ मध्ये पदार्पण केलं, त्याने २००८ मध्ये, आणि तेव्हापासून आम्ही संघासाठी आमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे, हो, आमची मैत्री खूप घट्ट आहे आणि या स्तरावर खेळताना एका विशिष्ट पातळीवर टिकून राहण्यासाठी काय लागतं, हे आम्हाला समजतं. अर्थातच, आमच्या पद्धती वेगळ्या आहेत, पण ते तसंच असायला हवं.”

Loading...

“प्रत्येकजण वेगळा असतो. या संघासाठी जे काही केलं आहे, त्याबद्दल कोणताही प्रश्न नाही, त्याने काय केलं आहे हे विचारण्याची गरज नाही. ते प्रत्येकजण पाहू शकतो आणि इथून पुढे तो काय करणार आहे, यात काही बदल झाला आहे असं मला वाटत नाही. तो तोच कोहली असेल ज्याला आपण ओळखतो, संघात येऊन चांगली तयारी करणे, धावा करणे आणि टीम इंडियासाठी सामने जिंकणे. मला त्याच्यात हेच दिसतं. तो कर्णधार असतानाही जवळपास असाच होता. मी कर्णधार असतानाही तो जवळपास असाच होता, आणि मला काहीही बदलण्याचं कारण दिसत नाही.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us