Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी भाजप मंत्र्याची अचानक भेट घेतली, Photo Viral

टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर सध्या चर्चेत आहे. सचिन तेंडुलकर याने 3.86 एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत 70 कोटी रुपये इतकी आहे. पण आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय बनला आहे.

| Updated on: Sep 08, 2026 | 10:26 AM
1 / 5
टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर सध्या चर्चेत असतो.  सचिन तेंडुलकर याने 3.86 एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत 70 कोटी रुपये इतकी आहे.

टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर सध्या चर्चेत असतो. सचिन तेंडुलकर याने 3.86 एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत 70 कोटी रुपये इतकी आहे.

2 / 5

आता राज्याचे इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सचिन तेंडूलकर यांची भेट घेतली. त्याचे कारण आत्तापर्यंत समोर आलेले नाही. अशातच आता या भेटीनंतर सचिन तेंडूलकर यांनी पहिला प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5

आज 'भारतरत्न' सचिन तेंडुलकर यांना भेटण्याचे भाग्य लाभलं. 'ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन'चे अध्यक्ष म्हणून, मी त्यांना फेडरेशनचे पुस्तक भेट दिलं आणि 'वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ' इथे येऊन आपल्या लाडक्या बाप्पाचे आशीर्वाद घेण्याचे निमंत्रण दिले, असं आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं होते.

4 / 5

यावर आता सचिन तेंडूलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन तेंडूलकर म्हणाले "ती एक अतिशय छान भेट होती. 'ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन'च्या अध्यक्षपदी तुमची निवड झाल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, आजची आपली चर्चा मला खूप आवडली. "

5 / 5

"कुटुंब आणि प्रवासाविषयीच्या गप्पांमधून सहजपणे आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांच्या गोष्टी आणि वन्यजीवांविषयीच्या सामायिक आवडीकडे वळणे, हा अनुभव नेहमीच खास असतो. या स्नेहपूर्ण निमंत्रणाबद्दल धन्यवाद; मी बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी उत्सुक आहे, असं म्हणत सचिनने शेलारांचं निमंत्रण स्विकारलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us