Sachin Tendulkar: लेक सारासाठी सचिन तेंडुलकरच्या मनात दाटल्या भावना; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाले…
Sachin Tendulkar Post For Sara Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी सारा तेंडुलकरसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अतिशय भावनिक आहे.

Sachin Tendulkar Post: ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आपली मुलगी सारा तेंडुलकरच्या २९ व्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक संदेश लिहिला आहे. सचिनच्या पोस्टमधून एका वडिलांचे प्रेम, आपल्या मुलीला मोठे होताना पाहून होणारा आनंद आणि तिला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेताना पाहून वाटणारा अभिमान स्पष्टपणे दिसून येतो. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या संदेशात, सचिनने वडील-मुलीचे नाते काळानुसार कसे बदलते हे स्पष्ट केले आहे.
सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “एक काळ होता जेव्हा मी तुला मार्ग दाखवायचो. आता, बहुतेक वेळा, तू तुझा स्वतःचा मार्ग निवडताना पाहून मला आनंद होतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सारा. माझं तुझ्यावर प्रेम आहे.” सचिन तेंडुलकरच्या संदेशातून आपल्या मुलीची प्रगती पाहून होणारा आनंद आणि तिच्या निर्णयांबद्दलचा आदर दिसून येतो. एकेकाळी साराचा हात धरून तिला मार्गदर्शन करणारा सचिन, आता तिला तिच्या स्वतःच्या मार्गावर पुढे जाताना पाहून आनंदी आहे.
There was a time when I was the one showing you the way.
Now, more often than not, I’m simply happy to see where you choose to go.
Happy birthday, Sara. Love you. ❤️ https://t.co/7nBiKgClCk
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 12, 2026
सारा तेंडुलकरचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी मुंबईत झाला. साराने तिचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली. सारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. साराचे नाव अनेकांसोबत जोडलेले पाहायला मिळते.
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलसोबत साराचे नाव जोडलेले पाहायला मिळाले आहे. अनेकदा ते दोघे एकत्र अनेक पार्टींमध्ये एकत्र दिसले होते. ते परदेशात फिरायलाही एकत्र गेल्याचे व्हायरल फोटो समोर आले आहेत. याबद्दल दोघांनीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
साराने मागच्या वर्षी एक पिलेट्स अकादमी सुरू केली आहे. तिने ही अकादमी मुंबईतील अंधेरी येथे सुरू केली आहे. ते महिलांच्या आरोग्यासंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी काम करते. पीसीओडी संबंधातील समस्या असो किंवा मानिसक आरोग्या संदर्भातील प्रश्न सोडवण्यावर भर दिला जातो.