Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरांनी शेअर केला ‘तो’ खास व्हिडिओ, कसं काय मंडळी म्हणतं…
Sachin Tendulkar Video Viral: सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने त्याच्या आईच्या रेसिपीबद्दल सांगितले आहे.

Sachin Tendulkar Video: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो छोट्या छोट्या गोष्टींची अपडेट सोशल मीडियावरुन देत असतो. नुकताच सचिनने एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सचिन किती खवय्या आहे ते पाहायला मिळत आहे. आज रविवार असून सचिन यांची रविवारी त्यांच्या घरी जेवणाचा बेत काय आहे त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. सचिनला घरच्या जेवणात अस्सल महाराष्ट्रीयन जेवण सर्वात जास्त आवडते. वरण-भात, वांग्याचे भरित, पुरणपोळी आणि मोदक हे त्याचे अत्यंत आवडीचे पदार्थ आहेत. अनेक मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितले आहे. अशातच आता सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर मराठीत एक व्हिडीओ शेअर केला असून त्याने आवडीने आवडीच्या जेवणाबगद्दल माहिती दिली आहे.
सचिन तेंडुलकर आता क्रिकेटपासून लांब झाला असता तरी तो आपल्या मोकळ्या वेळी सोशल मीडियावर भन्नाट व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच खवय्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरने आपल्या आईच्या रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात सचिन वरण भात, त्यावर तूप टाकून आवडीने खाताना दिसतोय आणि सोबत त्याने त्याच्या आईच्या हातच्या जेवणाचा किस्सा देखील सांगितला.
“मी जेव्हा जेव्हा मोठ्या टूरवर जात असतो . तेव्हा तेव्हा मी तिथे आईच्या हातचे जेवण मिस करत असतो. मी तिथून आईला फोन करून सांगायचो की, मला घरी आल्यावर वरण भात, बटाट्याची भाजी, फेवरेट प्रॉन्सची भाजी पाहिजे. प्रॉन्सच्या भाजीची मजा काही वेगळीचअसते. मला वाटत नाही की, माझ्या आईसारखी ती भाजी कुणाला बनवता येतं, ” असंही सचिन तेंडुलकर म्हणाला.
माझी आई आता स्वयंपाक करत नाही. पण तिने आमच्या घरी तिची रेसिपी शेअर केली आहे. पण तिच्यासारखं कोणालाच जमत नाही, असं सचिन तेंडुलकर म्हणाला. वरण आणि भातावर तूप तर असलंच पाहिजे आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, “हे हातानेच खाल्लं पाहिजे.”
दरम्यान, नॉन-व्हेज पदार्थांमध्ये सचिनला सीफूडची विशेष आवड असल्याचे त्याने एकदा बोलून दाखवले आहे. मुंबईतील प्रसिद्ध सीफूड रेस्टॉरंट्समधील कोळंबी (Prawns) करी, तसेच मटण बिर्याणी हा त्याच्या आवडीचा पदार्थ आहे. भारतीय आणि महाराष्ट्रीयन जेवणासोबतच सचिनला जपानी फूड विशेषतः सुशी खायला प्रचंड आवडते. जगभरात फिरताना तिथले स्थानिक आणि पारंपरिक पदार्थ खायला सचिनला फार आवडतात