Sanju Samson: संजू सॅमसन रजनीकांतचा जबरा फॅन, थलायवाचा Jailer 2 पाहण्यासाठी जे केलं एकदा वाचाच…

Sanju Samson News: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन हा दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा खूप मोठा चाहता आहे, हे काही नवीन नाही.

Sanju Samson: संजू सॅमसन रजनीकांतचा जबरा फॅन, थलायवाचा Jailer 2 पाहण्यासाठी जे केलं एकदा वाचाच...
| Updated on: Oct 20, 2026 | 10:46 AM

Rajnikanth Jailer 2: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन हा दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा खूप मोठा चाहता आहे, हे काही नवीन नाही. पण यावेळी, संजूने ‘थलायवा’वरील प्रेमासाठी जे केले आहे त्याने सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. रजनीकांतचा नवीन चित्रपट ‘जेलर २’ पाहण्यासाठी, संजू सॅमसनने आपली पत्नी, मित्र आणि टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसाठी एक संपूर्ण चित्रपटगृह बुक केले. या कृतीतून तो रजनीकांतचा किती मोठा चाहता आहे हे दिसून येते.

संजू सॅमसन रजनीकांतच्या चित्रपटांचा पहिला शो कधीही चुकवत नाही, पण यावेळी दिल्लीतील एका कार्यक्रमामुळे त्याला प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपट पाहता आला नाही. यामुळे त्याने, आपली पत्नी, मित्र आणि तमिळ समजणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफसाठी एका विशेष खाजगी स्क्रीनिंगचे आयोजन केले.

Loading...

या विशेष प्रसंगी आपला आनंद व्यक्त करताना संजू सॅमसन म्हणाला, “मला रजनी सरांचे चित्रपट पाहायला खूप आवडतात आणि मी नेहमीच त्यांच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत असतो. काल दिल्लीत माझा एक कार्यक्रम होता, त्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी मला तो पाहता आला नाही. पण आज, सुदैवाने, मला संपूर्ण थिएटर बुक करण्याची संधी मिळाली. मी माझे मित्र, माझी पत्नी आणि टीममधील तमिळ समजणाऱ्या सर्व सपोर्ट स्टाफ सदस्यांना आमंत्रित केले आहे.”

रजनीकांत यांची मोठ्या पडद्यावरील उपस्थिती, त्यांची खास शैली आणि त्यांचा स्वॅग यामुळे त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही लाखो चाहते मिळवले आहेत. संजू सॅमसनची अनोखी शैली रजनीकांत यांच्याबद्दलचा त्याचा आदर आणि आवड दर्शवते. आपल्या व्यस्त क्रिकेट वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंब आणि मित्रांसोबत रजनीकांत यांचा चित्रपट पाहण्याच्या संजूच्या निर्णयाचे चाहते कौतुक करत आहेत.

 

आता संजू पुन्हा मैदानात अगदी दोन दिवसांत खेळताना पाहायला मिळेल. २२ ऑक्टोबर २०२६ पासून भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळेल. या मालिकेत संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल. वैभव सूर्यवंशीला आणखी वाट बघावी लागणार असल्याचे समजत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us