शुभमन दुसऱ्या मुलीजवळ बसला, सारानं केलं असं काही की… त्या खास व्हिडीओची तुफान चर्चा!

सध्या सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सध्या सगळीकडे तुफान चर्चा होत आहे.

शुभमन दुसऱ्या मुलीजवळ बसला, सारानं केलं असं काही की... त्या खास व्हिडीओची तुफान चर्चा!
sara tendulkar and shubman gill
| Updated on: Jul 19, 2025 | 7:44 PM

Shubman Gill And Sara Tendulkar Viral video : बॉलिवूडप्रमाणंच क्रिकेट जगतात काय चाललंय, याची अनेकांना उत्सुकता असते. बॉलिवूडप्रमाणेच क्रिकेटमधील सेलिब्रिटींच्याही आयुष्याबाबत नेहमी वेगवेगळ्या चर्चा चालू असतात. सध्या क्रिकेटर शुभमन गिल आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर हे दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे हे दोघेही अनेकदा सोबत स्पॉट झालेले आहेत. असे असतानाच आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सुभमन गिल एका महिलेला बोलत असल्याचे दिसतेय. तर याच व्हिडीओत मागे बसलेल्या सारा तेंडुलकरची खास रिअॅक्शन कैद झाली आहे.

लंडनच्या पार्टीत दोघेही दिसले

नुकतेच माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याने लंडनमध्ये एक फंडरेजिंग पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी तसेच काही क्रिकेटपटूही आले होते. याच पार्टीतला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल दिसत आहेत. दोघ्याच्याही रिअॅक्शन या व्हिडीओमध्ये कैद करण्यात आल्या आहेत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

या व्हिडीओमध्ये पार्टीसाठी अनेक लोक जमा झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पार्टीसाठी आलेले पाहुणे खुर्चीवर बसून गप्पा मारताना दिसत आहेत. शुभमन गिल एका महिलेपुढे बसलेला असून तो तिच्याशी गप्पा मारत आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये गंभीर स्वरुपाची चर्चा होत असल्याचे दिसत आहे.

सारा दिसली स्लिव्हलेस ड्रेसमध्ये

तर दुसरीकडे शुभमनच्या अगदी माग सारा तेंडुलकर बसलेली आहे. साराने या पार्टीमध्ये पांढऱ्या रंगाचा स्लिव्हलेस ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये सारा तेंडुलकर खूप सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे तिच्या अगदी बाजूलाच बसलेला शुभमन हा टी शर्टमध्ये दिसतोय.

शुभमन समोर बसलेल्या महिलेला बोलत असताना दुसरीकडे सारा तेंडुलकर त्याच्याकडे मागे वाळून पाहताना दिसत आहे. काहीतरी खात असताना ती शुभमनकडे पाहात आहे. तिच्या हातात मोबाइलदेखील आहे. तिची हीच रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

रवींद्र जडेजा चिडवतानाचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून शुभमन आणि सारा हे रिलेशनशीपमध्ये आहेत, असे सांगितले जात आहे. या दोघांनीही मात्र याबाबत अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. काही दिवसांपूर्वी रवींद्र जडेजा सारा तेंडुलकरच्या आईकडे पाहून शुभमन गिलला चिडवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतरही सारा आणि शुभमनच्या नात्याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.