Shubman Gill: अरे हा शुभमन असा काय? मरमर करुन विराटने सामना जिंकवला, पण गिलने क्रेडिट भलत्यालाच दिलं

Shubman Gill IND vs WI ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे सामन्यांची मालिका सुरु असून पहिला सामना भारतीय संघाने जिंकला, आता यानंतर कर्णधार शुभमन गिल

Shubman Gill: अरे हा शुभमन असा काय? मरमर करुन विराटने सामना जिंकवला, पण गिलने क्रेडिट भलत्यालाच दिलं
| Updated on: Sep 28, 2026 | 9:38 AM

IND vs WI ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी तिरुवनंतपुरम येथे खेळला गेला. भारतीय संघाने कौतुकास्पद कामगिरी करत ५० चेंडू शिल्लक असताना आठ गडी राखून विजय मिळवला. भारतीय कर्णधार शुभमन गिल विरोधी संघाविरुद्धच्या या प्रभावी कामगिरीमुळे खूप आनंदित झाला होता. सामन्यानंतर त्याने आपल्या खेळाडूंचे कौतुक केले.

कालच्या सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिलने शतक ठोकले. विराट 139 धावा करुन नाबाद राहिला. यानंतरही गिलने सामना जिंकल्यानंतर कोहलीला क्रेडिट न देता भलत्यालाच क्रेडिट देले. सामना जिंकल्यानंतर गिलला जेव्हा विचारण्यात आले की तुला काय वाटते की कोणामुळे सामना जिंकलात, किंवा कोणाचे प्रयत्न जास्त होते, तेव्हा गिलने जे नाव घेतले आता त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

आपल्या कामगिरीबद्दल बोलताना तो म्हणाला, “जेव्हा मी बाद झालो, तेव्हा मला वाटले की मी सामना संपवायला हवा होता. पण तरीही माझ्यासाठी ही एक खूप समाधानकारक खेळी होती. कदाचित अल्झारी जोसेफविरुद्ध मारलेला फ्रंट-फूट ड्राईव्ह हा माझा सर्वात आवडता फटका होता.”

कुलदीप यादवबद्दल आपले विचार व्यक्त करताना भारतीय कर्णधार म्हणाला, “जेव्हा त्याच्यासारखे गोलंदाज गोलंदाजी करतात, तेव्हा ते विकेट्स घेतात. एका क्षणी आम्ही बॅकफूटवर होतो. पण त्याने आम्हाला सामन्यात परत आणले. त्याने महत्त्वाच्या क्षणी विकेट्स घेतल्या.”

विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलताना गिल म्हणाला, “तो अप्रतिम फलंदाजी करत आहे. तो पूर्वीपेक्षा जास्त खेळाचा आनंद घेत आहे. तो पूर्ण मोकळेपणाने खेळाचा आनंद घेत आहे. त्याच्यामध्ये चौकार मारण्याची क्षमता नेहमीच असते. त्याने देशासाठी इतके सामने जिंकले आहेत की, लोकांनी त्याला हव्या त्या पद्धतीने फलंदाजी करावी असे वाटते.

संघाच्या संयोजनाबद्दल आपले विचार व्यक्त करताना भारतीय कर्णधार म्हणाला, “आम्हाला असा खेळाडू हवा आहे जो आठव्या फलंदाजाच्या भूमिकेत फलंदाजीने २५-३० धावांचे योगदान देऊ शकेल. त्यामुळे आम्ही वेगवेगळे संयोजन आजमावण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us