स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरमध्ये All Is Not Well, मॅचनंतर एकमेंकींची तोंडही पाहिली नाही; Handshake न करता… Video Viral
Harmanpreet Kaur And Smriti Mandhana: हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्यात वाद आहे का असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होत आहे कारण एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Harmanpreet Kaur And Smriti Mandhana Handshake: भारत आणि वेस्ट झिम्बाब्वे यांच्यात टी-२० मालिका पार पडली. भारतीय महिला संघाने ही मालिका जिंकली. झिम्बाब्वे विरुद्धचा तिसरा सामना ९२ धावांनी जिंकत मालिका ३-० ने आपल्या नावावर केली आहे. शेफाली वर्मा आणि माजी कॅप्टन हरमनप्रीत कौर यांच्या वादळी खेळीने टीम हा विजय मिळवणं शक्य झाले. या मॅचमध्ये एक गोष्ट चर्चेचा विषय ठरत आहे आणि ती म्हणजे स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर. या दोघींमध्ये वाद असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा या मॅचनंतर रंगू लागल्या.
हरमनप्रीत कौरने स्मृतीला इग्नोर केलं?
झिम्बॉब्वेविरुद्ध टीम इंडियाची माजी कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने झंझावाती बॅटिंग करत अवघ्या 41 बॉलमध्ये नाबाद 91 धावा केल्या. तर लेडी सेहवाग म्हणजेच शफाली वर्माने धडाकेबाज बॅटिंग करत 37 बॉलमध्ये ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६९ धावा ठोकल्या. मात्र, मॅच जिंकल्यानंतर असा काही पाहायला मिळाले की यानंतर सर्वांनाच असं वाटू लागले की, भारतीय संघात काहीच चांगले सुरु नाहीये. कारण स्मृती आणि हरमन दोघींमध्ये वाद असल्याचा व्हायरल व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसत आहे.
मॅचनंतर हरमनप्रीतची बॉडी लँग्वेजवरुन समजत होते की काहीतरी बिनसले आहे. मॅच जिंकल्यानंतर हरमनप्रीतने आनंद तर साजरा केला. पण त्यावेळी हरमनप्रीतने सगळ्यांशी हँडशेक केला पण स्मृतीसोबत हँडशेक केला नाही, असं दिसत आहे. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मॅचनंतर हरमनप्रीत एका बाजूला निघून गेली अन् स्मृती दुसऱ्या बाजूने निघून गेली. त्यामुळे दोन्ही सिनियर खेळाडूंमध्ये वाद आहे की काय असा सवाल आता उपस्थित होत आहे.
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या. मॅचनंतरही जेव्हा हरमनप्रीत कौर पोस्टप्रेझेंटेशनमध्ये बोलायला आली तेव्हा ती रडू लागली. प्रतिक्रिया देताना ती भावूक झाली. यानंतर तिने माईक बाजूला फेकून दिला आणि तिथून निघून गेली. यामुळे आता हरमनप्रीत कौरला तिला कर्णधारपदावरुन काढल्याचा राग आलाय का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us