Suryakumar Yadav: निळाशार समुद्र ठिकाणी वसलेल्या शहरात सूर्याने घेतलं नवं घर, फ्लॅटची किंमत ऐकाल तर..
Suryakumar Yadav New Property: सूर्यकुमार यादवने नुकतीच एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे, या फ्लॅटची किंमत जर तुम्ही ऐकाल तर तुम्हालाच धक्का बसेल.

Suryakumar Yadav Property: सूर्यकुमार यादव टीम इंडियापासून दूर आहे. तो फॉर्ममध्ये नसल्याने सध्या तो फक्त भारतीय संघातूनच नाही तर मुंबईच्या संघातूनही बाहेर आहे. सूर्याला यंदाच्या रणजी ट्रॉफीच्या संघात सामील केले गेले नाही. मागील काही दिवसांपासून सूर्या याच कारणांमुळे चर्चेत होता, आता सूर्या एका नवीन कारणामुळे चर्चेत आला आहे.
सूर्याने आता एक नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ही प्रॉपर्टी मुंबईत नाही, भारतात पण नाही तर थेट दुबईत खरेदी केली आहे. सूर्याने ही गुडन्यूज सोशल मीडीयावर शेअर करत सर्वांसोबत शेअर केली आहे. सूर्यकुमार यादवने दुबईत नवीन घर डॅन्यूब प्रॉपर्टीजकडून खरेदी केले आहे.
सूर्यकुमार यादवने दुबईमध्ये त्याच जागेवर घर खरेदी केले आहे, जिथे बॉलिवूड किंग शाहरुख खानची इमारत बांधली जात आहे. शाहरुख खानच्या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारीही डॅन्यूब प्रॉपर्टीजचीच आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, टीम इंडियाच्या माजी टी-२० कर्णधाराने दुबईमध्ये घर का खरेदी केले? त्याने यामागील महत्त्वाचे कारण स्पष्ट केले.
सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले की, तो २०१४ मध्ये आयपीएल खेळण्यासाठी पहिल्यांदा दुबईला आला होता. त्यानंतर ते २०२० मध्ये दुसऱ्यांदा परत आला. भारतातील अनेक लोक आता दुबईत येत आहे. दुबईमध्ये गुंतवणूक करण्याच्या आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, “येथील जीवन पूर्णपणे वेगळे आणि आलिशान आहे. सुरक्षा हीही एक महत्त्वाचा घटक आहे. अर्थात मी जिथे राहतो मुंबईत तिथे ही सुरक्षा उपलब्ध आहे. दुबईत जेव्हा मी येतो तेव्हा मला खूप आनंद होतो.”
आता प्रश्न असा आहे की, सूर्यकुमार यादव यांच्या दुबईतील घराची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? सूर्यकुमार यादव यांनी दुबईमध्ये खरेदी केलेले घर हे ‘मॅरिटाइम सिटी’च्या मध्यभागी, समुद्रकिनारी वसलेला एक आलिशान परिसर आहे. या घरात ४० हून अधिक आलिशान सुविधा आहेत, ज्यामुळे ते आणखी आकर्षक बनते. ज्या गोष्टीने सूर्यकुमार यादवचे मन जिंकले, ती म्हणजे ‘लॉन्जेविटी लाउंज’. सूर्याच्या मते, अशा सुविधा निवासी प्रकल्पांमध्ये सहजासहजी उपलब्ध नसतात. या अपार्टमेंटमधील फ्लेटच्या किमती या ५ ते १० कोटींच्या घरात आहे.