Kedar Jadhav : संघाचे पथसंचलन म्हणजे केवळ शिस्तबद्ध पावलांचा..टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवचा RSS पथ संचलनातला फोटो व्हायरल

Kedar Jadhav : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवची एक वेगळी बाजू समोर आली आहे. केदार जाधव मूळचा पुणेकर आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. तेव्हापासून सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे.

Kedar Jadhav : संघाचे पथसंचलन म्हणजे केवळ शिस्तबद्ध पावलांचा..टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवचा RSS पथ संचलनातला फोटो व्हायरल
Kedar Jadhav
Image Credit source: instagram
| Updated on: Oct 21, 2026 | 2:04 PM

भारतीय क्रिकेट वर्तुळात केदार जाधव हे नाव सर्वांना परिचित आहे. टीम इंडियाकडून तो बरचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. पण हे फार कमी जणांना माहितीय की केदार जाधव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. केदार जाधव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात सहभागी झालेले. 20 ऑक्टोंबरला पुण्याच्या डेक्कन जिमखाना कॉलनीमध्ये आयोजित कार्यक्रमात संघाच्या पथ संचलनात त्याने सहभाग घेतला होता. केदार जाधवने संघाच्या गणवेशातील आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. केदार जाधवने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित घडामोडी आणि विचाराचा संदेश शेअर केला. पथ संचलनात सहभागी झाल्याचा फोटो त्याने शेअर केलाय. या फोटोमध्ये त्याने सफेद शर्ट, खाकी पॅन्ट, काळी टोपी आणि हातात दंड घेतल्याचं दिसत आहे.

केदार जाधव 41 वर्षांचा असून 3 जून 2024 रोजी त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती स्वीकारली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपल्या निर्णयाची माहिती दिलेली. केदार जाधवने 16 नोव्हेंबर 2014 रोजी श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलं होतं.

Loading...

केदार जाधव भारतासाठी किती वनडे खेळला?

केदार जाधव भारतासाठी 73 वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्याने 42.09 च्या सरासरीने 1389 धावा केल्या आहेत. या दरम्यान केदार जाधवने दोन शतंक आणि सहा अर्धशतकं झळकावली. गोलंदाजीतही केदार जाधवने योगदान दिलं. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 27 विकेट आहेत. टी 20 इंटरनॅशनलमध्ये केदार जाधव नऊ सामने खेळला. 58 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 123.23 चा आहे.

आयपीएलचे किती सामने खेळला?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये केदार जाधव चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सनरायजर्स हैदराबाद टीमचा भाग होता. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईमध्ये खेळताना त्याने अनेकदा उपयुक्त प्रदर्शन केलं. केदार जाधव आयपीएलमध्ये एकूण 95 सामने खेळला. त्यात त्याने 1196 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 123.17 होता. केदार जाधवने चार अर्धशतकं झळकवली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us