IND vs NZ : जिंकलो रे, 70 रन्सवर 5 विकेट, मग तिघांनी मॅच फिरवली, न्यूझीलंडला त्यांच्याच देशात दुसऱ्यांदा धूळ चारली

IND vs NZ 2nd T20 : भारत आणि न्यूझीलंडमध्ये पाच टी20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. आज दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाने विजय मिळवला. अटी-तटीचा हा सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला गेला.

IND vs NZ : जिंकलो रे, 70 रन्सवर 5 विकेट, मग तिघांनी मॅच फिरवली, न्यूझीलंडला त्यांच्याच देशात दुसऱ्यांदा धूळ चारली
Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 24, 2026 | 4:57 PM

शेवटपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या थरारक सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर एक चेंडू आणि चार विकेट राखून विजय मिळवला. क्राइस्टचर्चमध्ये दुसरा टी20 सामना झाला. भारताने टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने पहिली फलंदाजी करताना 5 बाद 180 धावा केल्या. टीम इंडियाने 19.5 ओव्हरमध्ये सहाविकेट गमावून हे लक्ष्य पार केलं. तिलक वर्मा 26 चेंडूत नाबाद (51), नमन धीर 17 चेंडूत (31) धावा आणि नितीश कुमार रेड्डी 13 चेंडूत नाबाद (26) धावा यांच्या बळावर भारताने हा विजय मिळवला. एकवेळ टीम इंडियाचं जिंकणं अवघड वाटत होतं. 70 रन्सवर 5 विकेट गेलेले. त्यानंतर तिलकने नमन धीरसोबत सहाव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. डाव सावरला. नमनने 31 धावा केल्या.

त्यानंतर आलेल्या नितीश कुमार रेड्डीसोबत मिळून तिलक वर्माने टीमला विजयी पथावर नेलं. भारताने या सीरीजमध्ये 2-0 आघाडी घेतली आहे. हेगले ओवलच्या मैदानात न्यूझीलंडच्या टीमने पुन्हा एकदा टॉस गमावला. पावरप्लेमध्ये न्यूझीलंडच्या टीमने फक्त 41 धावा केल्या. त्यात त्यांनी त्यांचे टॉपचे तीन विकेट गमावले. ग्लेन फिलिप्स आणि बेव जेकब्सने न्यूझीलंडची इनिंग संभाळली. 116 धावांची जबरदस्त भागीदारी केली.

Loading...

टीम इंडियाकडून यशस्वी गोलंदाज कोण?

फिलिप्सने सलग दुसरं अर्धशतक झळकवल. त्याने सर्वाधिक 70 धावा केल्या. जेकब्स 58 त्याने सुद्धा अर्धशतक झळकावलं. मायकल ब्रेसवेलने न्यूझीलंडला 180 धावांपर्यंत पोहोचवलं. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 33 रन्स देऊन 2 विकेट काढल्या. दुसरीकडे टी20 मध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजीत थोडी सुधारणा दिसून आली. मागच्या काही सामन्यात भारतीय गोलंदाजांनी 200 प्लस धावा दिल्या होत्या.

भारताचा डाव गडगडला

भारतीय टीमची सुरुवात थोडी धीमी झाली. पण संजू सॅमसन आणि अभिषेकने वेग दिला. पाचव्या ओव्हरमध्ये संजू आऊट झाल्यावर लाइन लागली. वैभव सूर्यवंशी सुद्धा चालला नाही. कॅप्टन श्रेयस अय्यरही लवकर आऊट झाला. फक्त 70 रन्सवर टॉपचे पाच फलंदाज तंबूत परतलेले. न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरे 3 विकेट काढले.

लास्ट ओव्हरमध्ये विजयासाठी किती धावा हव्या होत्या?

नमन धीरने (31) आक्रमक फलंदाजी करत भारतीय टीमला मॅचमध्ये आणलं. पण सँटनरने त्याचा सुद्धा अडथळा दूर केला. 15 व्या ओव्हरमध्ये 112 रन्सनवर नमन सुद्धा बाद झाला. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता होती. तिलक वर्मा आणि नितीशने पाच चेंडूत विजयी लक्ष्य पार केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us