Thomas Cup 2022 च्या फायनलमध्ये पोहोचला भारतीय संघ, HS Prannoy ‘हिरो’, 73 वर्षात पहिल्यांदा ऐतिहासिक कामगिरी

| Updated on: May 14, 2022 | 9:38 AM

Thomas Cup 2022: एकदिवस आधीच भारताने पाचवेळच्या चॅम्पियन मलेशियाला 3-2 ने नमवून सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता.

Thomas Cup 2022 च्या फायनलमध्ये पोहोचला भारतीय संघ, HS Prannoy हिरो, 73 वर्षात पहिल्यांदा ऐतिहासिक कामगिरी
Thomas cup
Image Credit source: twitter/bai
Follow us on

मुंबई: भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने (Indian Badminton Team) इतिहास रचला आहे. एचएस प्रणॉयच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर भारताने सेमीफायनलमध्ये डेन्मार्कला नमवून थॉमस कपच्या (Thomas Cup) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी 13 मे रोजी सेमीफायनलचा रोमांचक सामना झाला. 2-2 अशी बरोबरी असताना, विजयाची सर्व मदार प्रणॉयच्या (HS Prannoy) खांद्यावर होती. या अनुभवी खेळाडूने निराशही केलं नाही. त्याने डेन्मार्कच्या बॅडमिंटनपटूला हरवलं. तीन गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात त्याने भारताला 3-2 ने विजय मिळवून दिला. थॉमस कप ही बॅडमिंटनमधील सर्वात मोठी सांघिक स्पर्धा आहे. 73 वर्षाच्या या स्पर्धेच्या इतिहासात भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलाय.

दुखापत असूनही झुंजार खेळ

एकदिवस आधीच भारताने पाचवेळच्या चॅम्पियन मलेशियाला 3-2 ने नमवून सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. भारतीय पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत म्हणजे क्वार्टरफायनलमध्ये मलेशियाला 3-2 ने पराभूत केलं. त्यावेळी भारतीय पुरुष संघाचं कमीत कमी ब्राँझ मेडल निश्चित झालं होतं. आता रौप्यपदक निश्चित आहे. त्यावेळी सुद्धा शेवटच्या सामन्यात प्रणॉयच्या विजयामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. शुक्रवारी सर्व मदार प्रणॉयवर होती. त्याला दुखापत झाली होती. मात्र तरीही त्याने झुंजार खेळ दाखवत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्यांनी आव्हान जिवंत ठेवलं

बँकॉक येथे ही स्पर्धा सुरु आहे. विश्व चॅम्पियनशिपमधील रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांतने सिंगल्सची मॅच जिंकली. सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टीने आपआपले सामने जिंकून भारताचे अंतिम फेरीतील आव्हान कायम ठेवले होते. पण 2-2 अशा बरोबरी नंतर प्रणॉयने इतिहास रचण्यासाठी मदत केली.