Tokyo Olympic 2021: अवघ्या 11 मिनिटांत भारतीय हॉकी संघाचं सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं, असा केला बेल्जियमने पराभव

| Updated on: Aug 03, 2021 | 2:28 PM

तब्बल 41 वर्षानंतर सुवर्णपदकाच्या अत्यंत जवळ गेलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला बेल्जियमने 5-2 च्या फरकाने पराभूत केलं आहे.

Tokyo Olympic 2021: अवघ्या 11 मिनिटांत भारतीय हॉकी संघाचं सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं, असा केला बेल्जियमने पराभव
भारतीय पुरुष हॉकी संघ सेमीफायनलमध्ये पराभूत
Follow us on

Tokyo Olympics 20-2021 : तब्बल 49 वर्षानंतर म्हणजेच 1972 नंतर पहिल्यांदाच सेमीफायनलपर्यंत पोहोचलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला अखेर पराभव पत्करावा लागला. रोमहर्षक सामन्यात मिळालेल्या या पराभवाने सर्वच भारतीयांच टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ‘गोल्डचं’ अर्थात सुवर्णपदक पटकावण्याचं स्वप्नही तोडलं आहे. सामन्यात भारताला बेल्जियमने 5-2 अशा तगड्या फरकाने नमवलं असलं तरी सामना सुरुवातीपासून बेल्जियमच्या पारड्यात नव्हता. हे सारं समीकरण बदललं ते अंतिम 11 मिनिटांत. याच 11 मिनिटांनी करोडो भारतीयांची मनं तोडली.

सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत बेल्जियम संघाने गोल करत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली होती. पण भारताच्या मनदीप सिंगने 11 व्या मिनिटाला तर हरमनप्रीत सिंगने 8 व्या मिनिटाला गोल करत सामन्यात भारताला आघाडी मिळवून दिली. काही काळ आघाडीवर असलेल्या भारताने आणखी एक गोल खाल्ला आणि सामन्यात 2-2 असा स्कोर झाला. 49 व्या मिनिटापर्यंत असाच स्कोर होता. भारतीय संघाने तगडी टक्कर देत बेल्जियमला पुढे जाऊ दिले नाही. पण त्यानंतर शेवटच्या 11 मिनिटात सर्व बाजी पलटली…

तिसऱ्या क्वॉर्टरनंतर पलटला सामना

तिसऱ्या क्वॉर्टरच्या सुरुवातीला दोन्ही संघ 2-2 अशा बरोबरीत होते. त्यामुळे फायनलमध्ये कोण जाणार अशी चुरस होती. पण 49 व्या मिनिटाला बेल्जियम संघाला सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. ज्याचा फायदा घेत बेल्जियमच्या अलेक्सांद्र हेंड्रिक्सने तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरला गोल करत बेल्जियमला 3-2 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर काही मिनिटातच पुन्हा हेंड्रिक्सने (53) आणखी एक गोल करत भारताला दोन गोलने मागे टाकलं. त्यानंतर मात्र भारताला आघाडी घेता आली नाही. उलट शेवटच्या मिनिटाला बेल्जियमच्या जॉन डोहमेनने आणखी एक गोल करत 5-2 ने भारतीय संघाचा पराभव केला.

कांस्य पदकाची आशा मात्र कायम

भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्याने संघ अंतिम सामन्यात पोहोचणार नाही. ज्यामुळे सुवर्णपदकासह रौप्यपदकही भारताच्या हातातून निसटलं आहे. मात्र तिसऱ्या स्थानासाठी लढत करुन कांस्य पदक पटकावण्याची संधी अजूनही भारतीय संघाकडे आहे. भारतीय संघ कांस्यपदकासाठी जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पराभूत संघाचा सामना करेल. सेमी फायनलमध्ये विजय मिळवता आला नाही पण आता भारतीय संघाने कांस्य पदक तरी जिंकावं, अशीच अपेक्षा भारतीय फॅन्स करत आहेत

संबंधित बातम्या 

Tokyo Olympic 2021: हॉकी संघाच्या सेमीफायनलमध्ये पराभवानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले…

Tokyo Olympics 2021: भारताचं पदक हुकलं, डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये कमलप्रीत पराभूत

Women’s Hockey : गोलकीपर सविताने भिंत बनून हल्ले परतवले, गुरजीतने वाऱ्याच्या वेगाने गोल केला, भारत सेमी फायनलमध्ये

(In last 11 minutes Belgium hocky team defeated team india at semifinals of tokyo olympic)