Tokyo Olympics 2021: दुसऱ्या फेरीत पराभवानंतरही सुमीतची वाह वाह, 25 वर्षानंतर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय

| Updated on: Jul 26, 2021 | 2:19 PM

भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागल पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत रशियाच्या दानिल मेदवेदेवकडून पराभूत झाला. या पराभवानंतर यंदाच्या टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे.

Tokyo Olympics 2021: दुसऱ्या फेरीत पराभवानंतरही सुमीतची वाह वाह, 25 वर्षानंतर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय
सुमित नागल
Follow us on

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) टेनिस कोर्टवर अजून एका पराभवाला भारताला सामोरं जावं लागलं आहे. भारताला टेनिस स्पर्धेतील हा सलग दुसरा झटका असून यामुळे भारताचे यंदाच्या ऑलिम्पिकमधील टेनिस खेळातील आव्हानही संपुष्टात आले आहे. भारताचा टेनिसपटू सुमित नागल (Sumit Nagal) याला रशियाच्या डॅनियल मेदवेदेवने (Daniil Medvedev) दुसऱ्या फेरीत नमवत स्पर्धेबाहेर केले आहे.

पुरुष एकेरीच्या स्पर्धेत सुमित नागलच्या पराभवामुळे भारताची टेनिसमध्ये पदक विजयाची यंदाची शेवटची आशाही संपली आहे. आधी महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाची जोडी पराभूत झाली होती. आता सुमितही पराभूत झाला आहे. मात्र पराभवानंतरही सुमितने एक खास कामगिरी केली. सुमित 25 वर्षानंतर म्हणजेच 1996 मध्ये लिएंडर पेसनंतर ऑलिम्पिकमध्ये टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीपर्यंत पोहचणारा पहिला खेळाडू ठरला.

मेदवेदेव विरुद्ध सुमितमधील सामना

दुसऱ्या फेरीतील या सामन्यात मेदवेदेवने पहिला सेट 6-2 ने जिंकून सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा सेटही 6-1 ने जिंकत मेदवेदेने भारताच्या सुमितवर सहज विजय मिळवला. सुमित या सामन्यात पराभूत झाला तरी त्याने अतिशय चिवट झुंज दिली. रशियाचा डॅनियल मेदवेदेव यंदा पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असून त्याला सुमितने दिलेली झुंज वाखाणण्याजोगी होती.

हे ही वाचा

Tokyo Olympic 2020 Live : तलवारबाज भवानी देवी दुसऱ्या फेरीत पराभूत, बॅडमिंटनपटू बी साईप्रणीतही स्पर्धेतून बाहेर

भारताला मिळालं सुवर्णपदक, कुस्तीपटू प्रिया मलिकचं वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश

Tokyo Olympics 2021: तिसरा दिवस भारतासाठी निराशाजनक, मेरी कोम, सिंधूची चमकदार कामगिरी, इतर खेळाडू मात्र अयशस्वी

(Indian Tennis Player sumit nagal lost in mens tennis single by russias daniil medvedev)