भारताला मिळालं सुवर्णपदक, कुस्तीपटू प्रिया मलिकचं वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश

एका दिवसापूर्वीच भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोक्यो ऑलिम्प्किमध्ये भारताला रौप्य पदक जिंकवून दिलं होत. त्यानंतर आज लगेच युवा कुस्तीपटू प्रिया मलिकने हंगेरीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

भारताला मिळालं सुवर्णपदक, कुस्तीपटू प्रिया मलिकचं वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश
प्रिया मलिक
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 11:28 AM

World cadet wrestling championship : एकीकडे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताचे खेळाडू पदक जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. तर दुसरीकडे हंगेरी इथे सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये (World cadet wrestling championship) भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने (Priya Malik) या स्पर्धेत 75 किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक पटकावलं आहे.

प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूला 5-0 च्या फरकाने पराभूत करत हे सुवर्ण पदक मिळवलं आहे. प्रियाने 2019 मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्येही सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्याचवर्षी 2019 मध्ये दिल्लीमध्ये 17 व्या स्कूल गेम्समध्येही तिने सुवर्ण जिंकलं असून 2020 मध्ये पटना येथील नॅशनल कॅडेट चॅम्पियनशिपमध्येही तिने सुवर्ण पदक मिळवलं आहे.

हरियाणाच्या क्रिडा मंत्र्याकडून अभिनंदन

प्रियाच्या या यशाबद्दल हरियाणाचे क्रिडामंत्री संदीप सिंग यांनी ट्विट करत तिचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी लिहिलंय, “महिला कुस्तीपटू प्रिया मलिक, हरियाणाची सुपुत्रीने हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये आयोजित वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवल्याने तिंच अभिनंदन.”

हे ही वाचा :

रिओमध्ये हुलकावणी, डिप्रेशनने गाठलं, मात्र टोकियोमध्ये कमाल केली, मीराबाईच्या रौप्य विजयाच्या 10 खास गोष्टी

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

(Indian Wrestler Priya Malik Won Gold Medal For india in World cadet wrestling championship at hungary)

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.