Tokyo Olympics 2021: वंदनाची ऐतिहासिक कामगिरी, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, पुढील फेरीची आशा कायम

| Updated on: Jul 31, 2021 | 1:48 PM

सुरुवातीच्या काही सामन्यात पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करत विजय मिळवण्यास सुरुवात केली आहे.

Tokyo Olympics 2021: वंदनाची ऐतिहासिक कामगिरी, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, पुढील फेरीची आशा कायम
भारतीय महिला हॉकी संघ विजयी
Follow us on

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics)  भारतीय महिला हॉकी संघाने (India’s Women’s Hockey Team) ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला 4-3 च्या फरकाने पराभूत केलं. ग्रुप स्टेजमधील भारतीय महिला हॉकी संघाचा हा दुसरा विजय आहे. या विजयासह क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचण्याची भारताची आशा अजूनही कायम आहे. दरम्य़ान या दमदार विजयात सिंहाचा वाट मिळवला तो सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच वंदना कटारियाने (Vandana Kataria). तिने सामन्यात एक ऐतिहासिक कामगिरी करत हॅट्रिक लगावली. वंदनाने 3 गोल लगावत भारता विजय मिळवून दिला. ऑलिम्पिकमधील एका सामन्यात 3 गोल करणारी वंदना पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात पहिल्या क्वॉर्टरमध्ये 1-1 असा स्कोर होता. सामन्यात चौथ्या मिनिटाला वंदना कटारियाने पहिला गोल करत भारतीय महिलांना आघाडी मिळवून दिली. त्यानंतर काही वेळातच आफ्रीका संघानेही गोल करत बरोबरी साधली. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये देखील तसेच घडले. आधी भारतीय महिलांनी गोल केल्यानंतर पुन्हा आफ्रिकेच्या महिलांनी पलटवार करत 2-2 असा स्कोर केला.

वंदनाची हॅट्रिक, भारताचा विजय

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघानी पुन्हा एक-एक गोल केला. ज्यामुळे दोन्ही संघ 3-3 अशा स्कोरवर होते. ज्यानंतर शेवटचा आणि चौथा असा निर्णायक क्वॉर्टर सुरु झाला. ज्यात पुन्हा एकदा वंदना कटारियाची जादू चालली आणि तिने एक अप्रतिम गोल करत भारताला 4-3 ची आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर आफ्रिका संघाला एकही गोल करता न आल्याने भारतीय महिला विजयी झाल्या.

क्वॉर्टर फायनलच्या तिकिटासाठी आयर्लंडचा पराभव महत्त्वाचा

भारतीय महिला हॉकी संघाने क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले आहेत. आता फक्त आज सायंकाळी होणाऱ्या ग्रेट ब्रिटेन आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात आयर्लंडचा पराभव होणं गरजेचं आहे. त्यानंतरच भारताला क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश मिळू शकतो.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

Tokyo Olympics 2021: जिच्याविरुद्ध 4 वेळा पराभूत झाली, तिलाच नमवत पदक केलं निश्चित, असा मिळवला लवलीनाने विजय

(Indian womens hocky team beats south africa team with vandanas hatrick)