Tokyo Olympics 2021: भारतीय महिला संघाचा पहिला विजय, आयर्लंडवर 1-0 ने पराभव

| Updated on: Jul 30, 2021 | 12:13 PM

आयर्लंडवर भारतीय महिला हॉकी संघाने 1-0 ने विजय मिळवला. हा विजयही भारताला चौथे क्वॉर्टरमध्ये मिळालं. 14 पेनल्टी कॉर्नरनंतर भारताने पहिला गोल केला.

Tokyo Olympics 2021: भारतीय महिला संघाचा पहिला विजय, आयर्लंडवर 1-0 ने पराभव
भारत विरुद्ध आयर्लंड
Follow us on

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये अखेर भारतीय महिलांनी पहिला विजय मिळवला आहे. एकीकडे पुरुष हॉकी संघ चांगलं प्रदर्शन करत असताना महिला हॉकी संघाला एकही विजय मिळवता आला नव्हता. मात्र अखेर आयर्लंड संघाला 1-0 ने नमवत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. भारताने सामन्यात 3 मिनिटं शिल्लक असताना चौथ्या क्वॉर्टरमध्ये गोल करत सामना आपल्या नावे केला. या विजयासोबतच भारताची उपांत्य फेरीत जाण्याची आशा अजूनही कायम आहे.

भारतासाठी आजचा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं होता. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजचा सामना जिंकण अनिवार्य होतं. भारतीय संघाने सुरुवात आक्रमक केली. पहिल्या 3 क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. भारताने आयर्लंडविरुद्ध 14 पेनल्टी कॉर्नर गमावले. पण सामन्यात शेवटची 3 मिनिटं शिल्लक असताना भारताने गोल करत सामन्यात विजय मिळवला.

भारताने आयर्लंड 1-0 ने नमवला

सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ चिवट खेळी करत होते. सामन्यात शेवटची काही मिनिटं शिल्लक असतानाही सामन्यात स्कोर 0-0 होताच. त्यावेळी भारतीय कर्णधार रानी रामपालच्या मदतीने नवनीत कौरने गोल करत सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांत गोल केला. या एकमेव गोलसोबतच भारताने विजय निश्चित केला. आता भारतीय महिला हॉकी संघाला क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी शनिवारी दक्षिण आफ्रिका संघाला नमवणे अनिवार्य आहे.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

Tokyo Olympics 2021: सिंधू, दीपिका कुमारी, पूजा रानीची चमकदार कामगिरी, हॉकी टीमकडून मात्र निराशा, भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक

(Tokyo olympics 2020 india vs ireland womens hockey team india won the match)